Horoscope Today 13 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 13 मे 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आज आज दिवस थोडा संघर्षमय जाईल, नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात   

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवा ठरवलेल्या कामाबद्दल शांतपणे बसून विचार करणे गरजेचे ठरेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज छोट्या छोट्या घातक सवयी बदलल्या, तर भरपूर काम करू शकाल, महिलांनी त्यांचा दृष्टिकोन बदलावा.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज भूतकाळातील मिळालेल्या अपयशात गुंतून पडलात, तर प्रगती होणार नाही तरुणांचे विवाह ठरतील

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज पूर्वी केलेले आर्थिक नियोजन आता उपयोगी पडेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज समोरच्या माणसाचा चढलेला पारा कसा खाली आणायचा, याचे चातुर्य तुमच्याकडे असल्यामुळे इतरांची मने जिंकाल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज लांबच्या प्रवासाचे योग येतील, आर्थिक नियोजनांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता राहील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज मित्रांबरोबर सहलीच्या बेत ठरवाल, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज खाण्यावर बंधन पाळायला हवे नाहीतर पचनशक्ती बिघडेल, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतल्यामुळे सौख्य लाभेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज वागण्यामध्ये चैनीला महत्त्व द्याल, नोकरी व्यवसायात स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे होतील

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज गायन वादन अभिनय नृत्य यासारख्या कलांमध्ये प्राविण्य मिळेल, महिलांना आर्थिक लाभ कमी होतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे थोडा मानसिक ताण राहील, परंतु भाग्याची साथ असल्यामुळे कोणत्याही टोकाच्या गोष्टी घडणार नाहीत.

हेही वाचा: 

Budh Chandra Yuti 2025: पुढच्या आठवड्यात 'या' 5 राशींनी बक्कळ कमाईसाठी सज्ज व्हा! 26 मे  बुध-चंद्राचा मोठा गेम, शुभ योगामुळे आर्थिक वाढ

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)