South Cinema Actress Struggle Life: आधीच्या दशकांमध्ये सुपरस्टार हिरोच्या जीवावर फिल्म हिट (Hit Film) ठरणार की, नाही? याची गणितं मांडली जायची. पण, आता फक्त हिरोच नाहीतर, हिरोईन कोण आहे? याचाही विचार केला जाऊ लागला आहे. गेल्या दहा वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट बनलेत, ज्यात महिला अभिनेत्री (Actress) मुख्य भूमिकेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, हे सिनेमे लोकांना आवडले असून सुपरहिटही ठरले आहेत. अनेक चित्रपटांनी तर शंभर कोटींच्या क्लबमध्येही एन्ट्री घेतली आहे. पण साऊथ सिनेमांमध्ये मात्र असा ट्रेंड दिसला नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत (South Cinema) असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी शंभर कोटींचा आकडा ओलांडला आहे, पण जवळजवळ सर्वच चित्रपट हिरोंमुळे गाजले आहेत.
पण, आता परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे, पहिल्यांदाच दक्षिणात्य चित्रपटानं शंभर कोटींचा आकडा ओलांडला आणि त्या चित्रपटात मुख्य भूमिका एका अभिनेत्रीची आहे.
'लोका चॅप्टर 1'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
मल्याळम सुपरहिट चित्रपट 'लोका चॅप्टर 1'नं दक्षिण चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. काही दिवसांतच या चित्रपटानं देशांतर्गत बाजारात 46 कोटींची कमाई केली, तर परदेशात या चित्रपटानं 6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच, सुमारे 52 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. अशाप्रकारे, चित्रपटाचं एकूण कलेक्शन 105 कोटींच्या पुढे गेलं आहे.
कल्याणी प्रियदर्शननं दिला 100 कोटींचा सिनेमा
लोकाच्या पहिल्या अध्यायात अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन मुख्य भूमिकेत आहे. या कामगिरीसह, हा चित्रपट दक्षिणेकडील चारही चित्रपट उद्योगांमध्ये - तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम - सर्वाधिक कमाई करणारा महिला प्रमुख चित्रपट बनला आहे.
आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स चक्काचूर
कल्याणी प्रियदर्शनच्या चित्रपटानं कीर्ती सुरेशच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या महानती चित्रपटाला मागे टाकलं आहे. ज्यानं 85 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटानं अनुष्का शेट्टीच्या 'रुद्रमादेवी' (84 कोटी), अरुंधती (70 कोटी) आणि भागमती (67) यांचे रेकॉर्डही मोडले.
बड्या हिरोईन्स जे करू शकल्या नाहीत ते...
तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत अनुष्का शेट्टी, समांथा रूथ प्रभू, राम्या कृष्णन आणि नयनतारा सारख्या अनेक महिला सुपरस्टार्स आहेत, ज्यांनी अनेक वर्ष दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर राज्य केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. पण यापैकी एकही चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :