Horoscope Today 5 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 5 सप्टेंबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तब्येतीकडे लक्ष द्यायला विसरू नका, पाठीचे मणक्याचे दुखणे ज्यांना आहे त्यांनी काळजी घ्यावी
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज घरातील एखाद्या समस्येवर तोडगा काढण्याचा गंभीरपणे विचार करावा लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी प्रकृती सांभाळण्याबरोबरच अभ्यासात मन एकाग्र करण्याची गरज आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील, व्यवसाय नोकरीमध्ये निर्भयता हा गुण ठेवावा लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांनी आपली ध्येय क्षमता ओळखून त्याप्रमाणे वागावे, जवळच्या नातेवाईकांकडून फसवणूक होत नाही ना याचा विचार करावा
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज पैसा मिळवण्यासाठी अनेक प्रलोभनी समोर येतील, पण पैशाचा अति लोभ टाळणे हितकर ठरेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज स्त्रिया अति संवेदनशील असतील, त्यामुळे दुःख निर्माण होईल, वेळेचा गबाळेपणा परवडणार नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कोणताही बदल हा जीवन समृद्ध करणाराही असू शकतो, याचा विचार करावा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज एखाद्या गोष्टीचा फायदा कसा करून घ्यायचा, हे नोकरी व्यवसायिकांनी ठरवणे गरजेचे आहे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये यश येण्यासाठी मोठ्या लोकांची मीनतवारी करावी लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज स्त्रियांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट पुढे जाणार नाही, आज आत्मविश्वासाने कामाला लागा
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल, त्यातून आर्थिक लाभही होईल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: सप्टेंबरचा दुसरा आठवडा कसा जाणार? कोणासाठी लकी? कोणासाठी टेन्शनचा? मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)