Dr. Arora Web Series : सोनी लिव्हचा कॉमेडी ड्रामा 'डॉ. अरोरा - गुप्त रोग विशेषज्ञ' (Dr. Arora) या वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून, ती प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे. प्रेक्षकही उत्सुकतेने या सीरिजच्या प्रिमिअरची वाट पाहत आहेत. ‘डॉ. अरोरा’ ही सीरिज एक लैंगिक सल्लागार आणि त्यांच्या अनेक रूग्णांचे जीवन व त्यांच्या समस्यांना सादर करते. अभिनेता विवेक मुश्रान यांनी याच व्यवसायाचा पूर्वजांचा वारसा असलेल्या एका व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. ज्ञानाचा अभाव आणि पुराणमतवादी मानसिकतेमुळे, तो आपल्या मुलाच्या इच्छा समजून घेण्याविरुद्ध बंड करतो.
‘डॉ. अरोरा - गुप्त रोग विशेषज्ञ' ही वेब सीरिज 22 जुलैपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच समाजाचे प्रबोधन केले जाणार आहे.
आशा आहे आता तरी लोकांना या गोष्टी कळतील!
या सीरिजबाबत सांगताना विवेक मुश्रान यांनी लैंगिक समस्यांबाबत चर्चा करणाऱ्या लोकांकडे कशाप्रकारे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आजकाल आपण वर्तमानपत्रामध्ये लैंगिक समस्यांवरील स्तंभ वाचतो, तेव्हा या समस्या अनुभवणाऱ्या व्यक्तींबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी हसतो आणि त्याची सहज थट्टा करतो. 'डॉ. अरोरा' ही सीरिज या वस्तुस्थितीबाबत आपल्याला जाणीव करून देते की, लैंगिक समस्या वारंवार हलक्या-फुलक्या व मनोरंजन या दृष्टीनेच पाहिल्या जाऊ शकत नाहीत. त्या एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत त्रासदायक असू शकतात. मला आशा आहे की, ही सीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षक हे समजून घेतील आणि अधिक संवेदनशील होतील की, त्यांना जे मनोरंजन वाटते, त्याचा प्रत्यक्षात अनुभवत असलेल्या व्यक्तींसाठी ती एक अत्यंत भयावह परिस्थिती असते.’
मध्य भारताची पार्श्वभूमी असणाऱ्या या सीरिजमध्ये प्रतिभावान अभिनेत्री कुमुद मिश्रा प्रमुख भूमिकेत झळकत आहे. इम्तियाज अली निर्मित या सीरिजचे दिग्दर्शन साजिद अली व अर्चित कुमार यांनी केले आहे. तसेच, मोहित चौधरी निर्माता असलेल्या या सीरिजमध्ये गौरव पराजुली, विवेक मुश्रान, अजितेश गुप्ता, विद्या माळवदे, संदीपा धार आणि शेखर सुमन हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘डॉ. अरोरा - गुप्त रोग विशेषज्ञ' ही वेब सीरिज 22 जुलैपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच समाजाचे प्रबोधन केले जाणार आहे.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या