मुंबई : लॉकडाऊन काळात प्रकाशझोतात आलेलं नाव म्हणजे अभिनेता सोनू सूद. मात्र, सोनू त्याच्या अभिनय किंवा चित्रपटामुळे नाही तर त्याच्या सामाजिक कार्यामुळे सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी साने सूदने मदत केली होती. आता पुन्हा एकदा सानू चर्चेत आलाय. मात्र, यावेळी कुठल्याही कामामुळे नाही तर त्याच्या एका फॅनला ट्वीटरवर दिलेल्या उत्तरामुळे तो चर्चेत आला आहे.


सोनू सूद हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो त्याच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. अनेकजण सोनूला ट्वीटर वर टॅग करत मदत मागितल्याची उदाहरणे आहेत. आज एका चाहत्याने विचित्र मागणी केली. मात्र, त्यालाही प्रतिसाद देत सानूने मजेशीर उत्तर दिलंय.


काय आहे ट्वीट?
सोनू सूद भावा, मला अॅमेझोन प्राईमची 1 वर्षाची मेंबरशीपसाठी मदत कर ना. मी व्ही मूव्हीची वाट पाहतोय.
सोनूचं उत्तर : मेंबरशीपसोबत मी तुला टीव्ही, एसी आणि पॉपकोर्न पण पाठवतो.

सानूचा हुमर अनेकांना आवडला आहे. अनेकांनी या ट्वीटला रिट्वीट केलंय. तर अनेकांनी रिप्लाय देखील दिले आहेत.

कोरोना काळात अटी-शर्थींसह 'द कपिल शर्मा शो'चं शुटिंग सुरु, पाहुणा म्हणून सोनू सूदची हजेरी

कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला : सोनू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. आता अभिनेता सोनू सूदने देखील ट्वीट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. तर जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 वेळेतच होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सांगण्यात आलं आहे.

सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या करोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये”.

SSR Suicide Case | रिया चक्रवर्तीला लवकरच अटक होण्याती शक्यता; सीबीआयकडून रियाची चौकशी सुरु