Sonu Nigam gets banned: सोनू निगम (Sonu Nigam) हा एक लोकप्रिय गायक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत बऱ्याच बॉलिवूड (Bollywood) गाण्यांसाठी आपला आवाज दिला. त्याच्या आवाजाची जादू आजही तितकीच कायम आहे. सोनू निगमने आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चढ उतारांचा सामना केला. अलिकडेच अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीतील चढ - उतारांबद्दल सांगितले. कॉपीराइट (Copyright) आणि रॉयलटी हक्कांबाबत आवाज उठवल्यानंतर प्रमुख म्युझिक कंपन्यांनी (Music Company) त्याला बॅन केलं होतं. त्याच्यासोबत काम करणे थांबवले होते. एका मुलाखतीत सोनू निगमने त्या काळाची आठवण सांगितली.
म्युझिक कंपन्यांनी सोनू निगमवर कारवाई केली (Sonu Nigam Banned by music company)
कोमल नाहटा यांच्या 'गेम चेंजर्स' या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सोनू निगम म्हणाला, 'माझी वेळ आली, गेली आणि आता ती वेळ पुन्हा परत आली. हा सगळा वेळेचा खेळ आहे. जेव्हा मी करिअरच्या शिखरावर होतो. तेव्हा लोकांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. माझे अल्बम रिलीज व्हायचे. माझे पोस्टर्स देखील विकले जायचे. मग मी कॉपीराइचा मुद्दा उचलला. हा मु्द्दा खूप प्रचलित झाला. यानंतर टी- सिरीजने माझ्यावर बंदी घातली. झी म्युझिकनेही माझ्यासोबत काम करणं बंद केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की, 'अरे, हा तर एक अॅक्टिव्हिस्ट बनला आहे'', असं सोनू निगम म्हणाला.
सोनू निगम म्हणाला की, 'मी कधी विचारही केला नाही, की मला बॅन केलं जाईल. मला वाटलं होतं की, प्रश्न सुटतील. पण परिस्थिती अधिकच बिघडत चालली होती. जेव्हा माझे मार्ग हळूहळू बंद होऊ लागले, तेव्हा असं लक्षात आलं की, मला गाणं देण्यापासून रोखू शकता, परंतु स्टेज परफॉर्म करण्यासाठी मला कुणीही रोखू शकत नाही', असं सोनू निगम म्हणाला. 'आता काळ बदलत चालला आहे. म्युझिक कंपनी आता गायकांना रॉयल्टी देत आहेत'.
'आज आपण एकत्र येतो, बसतो जेवतो, हसत राहतो. पण या मुद्द्यावर कुणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा होता. कॉपीराइट आणि रॉयल्टीचा हा मुद्दा आयुष्यातील एका मोठ्या उद्देशाचा भाग आहे. या गोष्टीला लता मंगेशकर यांनी सुरु तर केलं, परंतु, त्यांच्याकडून ते अपूर्ण राहिलं', सोनू निगम यांनी स्पष्ट केलं की, या लढ्यासाठी ते आपलं करिअर पणाला लावायलाही तयार होते. कारण त्यांना, असं वाटत होतं की, इतर कुणामध्येही हे करण्याचे धाडस नसेल. 'कायदा बदलल्यानंर संगीत कंपन्यांच्या लक्षात आले होते की, 'त्यांच्या मागण्या चुकीच्या नव्हत्या'. कालांतराने सिनेइंडस्ट्रीचा दृष्टिकोन बदलला. नंतर त्याच संगीत कंपन्यांनी पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
