Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: जेव्हा-जेव्हा बॉलिवूडमधल्या (Bollywood News) सर्वाधिक चर्चेत असलेल्या भांडणांचा विषय निघतो, तेव्हा-तेव्हा कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्यातील भांडणाची चर्चा नेहमीच होते. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या भांडणांपैकी एक म्हणजे, सुपरस्टार हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्यातील वाद. एक वेळ अशी होती, ज्यावेळी हेडलाइन्समध्ये फक्त आणि फक्त दोघांचीच नावं झळकायची. यांच्यातल्या वादानं अख्ख्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजलेली. कंगना रनौतनं हृतिक रोशनवर अनेक खळबळजनक आरोप केलेले. जे अभिनेत्यानं स्पष्टपणे फेटाळून लावले. आता कित्येक दशकानंतर पुन्हा वाद उफाळून आला आहे. 

Continues below advertisement

हृतिक-कंगना वाद पुन्हा का उफाळला? (Kangana Ranaut Slams Hrithik Roshan)

अलीकडेच सोशल मीडियावर 'सॉरी हृतिक' (Sorry Hrithik) ट्रेंड सुरू झाला, ज्याचा रोख कंगना रनौत हिच्याकडेच होता. विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर 'जनरेशन झेड' (Gen Z) बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना रनौतवर टीका झाली आणि तिच्या विरोधात मीम्सचा (Memes) पाऊस पडला. याच दरम्यान, काही लोकांनी हृतिक रोशनचा उल्लेख करत असं सुचवलं की, सर्वांनी त्याची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या जुन्या कायदेशीर वादाची आठवण करून दिली. या वाढत्या ट्रेंडवर हृतिक रोशन यानं प्रतिक्रिया दिली, ज्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. भावनांच्या आहारी न जाता लोकांनी तथ्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं स्पष्ट मत अभिनेत्यानं व्यक्त केलं.

Continues below advertisement

एका इन्फ्लुएन्सरच्या पोस्टवर कमेंट करताना हृतिक रोशन यानं लिहिलं की, केवळ 'बी' (B) आवडत नाही म्हणून 'ए' (A) ची बाजू घेणं, ही आपल्या समाजातील एका मोठ्या पद्धतशीर समस्येचा (Systemic Issue) एक छोटासा भाग आहे. त्यानं नमूद केलं की, योग्य संदर्भ आणि तथ्यांवर आधारित चर्चा होईल, अशा वेळेची तो वाट पाहील, कारण तोच योग्य दृष्टिकोन असेल. त्यानं पुढे म्हटलं की, तो वाट पाहील, तरीही त्यानं हे मान्य केलं की, शेवटी आता या गोष्टीची फारशी कोणाला पर्वा उरलेली नाही. 

हृतिक रोशनवर बरसली कंगना, गर्लफ्रेंडचं नाव घेत म्हणाली... (Kangana Ranaut On Hrithik Roshan)

हृतिक रोशनची कमेंट पाहून कंगनाची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच्या कमेंटवर ती भडकली. इन्स्टाग्रामवर कंगनानं हृतिक रोशनसाठी लिहिलं की, प्रिय हृतिक, मला खूपच आनंद आहे की, तुला तुझी खरी जोडीदार मिळालीय... सबा आझादसोबतची तुझी जोडी खरंच खूप सुंदर दिसते. तुम्ही दोघेही सीरिअस रिलेशनमध्ये आहात, त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही महिलेची अशाप्रकारे थट्टा करणं किंवा तिला त्रास देणं तुला शोभत नाही... त्याऐवजी, जे लोक तुझं नाव वापरून मला त्रास देत आहेत किंवा माझ्याशी गैरवर्तन करतायत, त्यांचा तू निषेध केला पाहिजे. आगीत तेल ओतू नकोस आणि तुझ्या पार्टनरलाही लाजिरवाणं वाटू देऊ नकोस... मला आशा आहे की, तू समंजसपणे वागशील आणि भविष्यात अशा अनावश्यक टिप्पण्या करणं थांबवशील..."

कंगना-हृतिक यांच्यातील जुना वाद नेमका काय? 

2016 मध्ये, कंगना रनौत यानं हृतिक रोशनचा उल्लेख 'सिली एक्स' असा केला होता, ज्यावर हृतिकनं स्पष्ट केलेलं की, त्यांच्यात कधीही कोणतंही नातं नव्हतं. त्यानंतर हृतिकनं कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्याचं आवाहन केलेलं. पण, कंगनानंही प्रत्युत्तर म्हणून कायदेशीर नोटीस पाठवली आणि हृतिक दोघांमधलं नातं लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. हा वाद पोलीस प्रकरणापर्यंत पोहोचला आणि अनेक वर्षांनंतर असं समोर आलं की, कंगनाच्या दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा सापडला नाही.

या काळात हृतिकला खूप काही सहन करावं लागलं, अनेकजण त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले होते. त्यांच्या स्टारडममुळे त्याला काही प्रमाणात लक्ष्य केलं गेलं, तरीही या सुपरस्टारनं या परिस्थितीवर कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परिणामी, आता इतक्या वर्षांनंतर आता लोक म्हणत आहेत की, जगानं हृतिकची माफी मागितली पाहिजे. 'सॉरी ऋतिक' (Sorry Hrithik) या ट्रेंडमुळे पुढे काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव