मुंबई : आपल्याला कसे काय अनुभव येतात तसं आपण आपलं मत बनवत असतो. मग ते मत आपल्या शेजाऱ्यांबद्दल असेल.. किंवा मित्राबद्दल.. सहकाऱ्यांबद्दल.. राज्याबद्दल.. देशाबद्दल. अनेकदा आपल्या शेजाऱ्यांशी वाद होतो. दोन भावात भांडणं होतात. घरं तुटतात. पण असं होत असलं तरी कोणी देशाला नावं ठेवत नाहीत. प्रत्येकाला आपला देश प्यारा असतो. आपली मातृभूमी प्यारी असते. पण इथे एक अपवाद आहे. तो अपवाद आहे हिंदी इंडस्ट्रीतला एव्हरग्रीन आवाजा असलेला गायक सोनू निगम.


सोनू निगम गेल्या काही वर्षापासून सतत चर्चेत आहे. आधी त्याने गाण्याच्या बाबतीत राईट्सचा मुद्दा काढला आणि मग बड्या लोकांनी त्याला गाण्यापासून बाहेर ठेवलं. लॉकडाऊनमध्ये सोनू पुन्हा चर्चेत आला तो आपल्या सेल्फी व्हिडिओतून. सोनू लॉकडाऊनमध्ये दुबईला होता. तिथून त्याने व्हिडिओ करत भारतात गायन क्षेत्रात असलेली मनमानी.. दबाव तंत्राचा उल्लेख केला. त्यात त्याने टी-सीरिजचं नावही घेतलं होतं. आता सोनूने नवं स्टेटमेंट दिलं आहे. त्या स्टेटमेंटमुळे प्रत्येकजण पुन्हा बुचकळ्यात पडला आहे.


सोनू लॉकडाऊन काळात दुबईला होता हे प्रत्येकाला माहित आहे. त्याचं कुटुंबही आता दुबईला असतं. त्याला एका मुलाखतीत मुलाला तू कोण बनवणार असा प्रश्न विचारल्यावर सोनूने दिलेलं उत्तर पाहता सगळे आवाक झाले. सोनू म्हणाला, माझ्या मुलाने खरंतर गायक होऊच नये असं मला वाटतं. त्याला गायक व्हायचं असेल तर निदान त्याने भारतात गायक होऊ नये. बाकी कुठेही त्याने काहीही केलं तरी चालेल. सध्या माझा मुलगा दुबईत आहे. तिथे तो टॉप गेमर आहे. त्याला काय व्हायचं ते तो ठरवेल. पण गायक व्हायचं तर भारतात त्याने गायक होऊ नये.


सोनू निगमच्या या उत्तराने मात्र सगळेच गारद झाले आहेत. सोनूच्या मुलाचं नाव निवान. सोनू आणि भारतातल्या म्युझिक कंपन्या यांच्यात बराच झगडा झाला. सोनूचा आवाज उत्तम असूनही त्याला काही वर्षापासून गाणी मिळेना झाली. अलिकडच्या काळात अनेक नवे गायक आले खरे. पण सोनूचा आवाज तसाच एव्हरग्रीन असूनही त्यला हवी तशी गाणी मिळाली नाहीत. अर्थात त्यामुळे सोनूचं फार काही अडलं नाही. त्याचे स्टेज शो.. चालू होतेच. शिवाय, प्रादेशिक भाषांमध्ये तो गातो आहेच. असं असलं तरी हिंदी इंडस्ट्रीचा असलेला त्याचा झगडा चालूच आहे. बड्या म्युझिक कंपन्यांनी सोनूला धडा शिकवायचं ठरवलं आणि त्यातून सोनू आपोआप बाहेर फेकला गेल्याचं चित्र समोर आलं. सोनू आपल्या सोशल मीडियातून बोलत असतोच. तसंच काहीसं आता झालं. पण सोनूच्या मुलााबद्दलच्या या टीप्पणीने मात्र अस्सल देशभक्त दुखावला गेला आहे हेही तितकंच खरं.