Sonam Kapoor Second child name: बॉलीवूडची फॅशनिस्टा आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर (Sonam kapoor) आणि आनंद अहुजा यांना 29 मार्च 2026 ला मुलगा झाला. चाळीसाव्या वर्षी दुसऱ्यांदा आई झालेल्या सोनम कपूरने तिच्या दुसऱ्या बाळाचं नाव ठेवलंय. सोशल मीडिया पोस्ट करत तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तिच्या पहिल्या मुलाचं नाव 'वायू ' आहे. दुसऱ्या मुलाचा जन्म एकादशी दिवशी झाला होता. पहिल्या मुलाच्या नावाप्रमाणेच दुसऱ्या मुलाचे नावही सोनमने हिंदू पुराणानुसार ठेवल्याचे दिसलं. तिने दोन्ही मुलांसोबत फोटो शेअर करत मुलाचं नाव आणि त्याच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. या खास पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसतंय.
सोनमच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ?
सोनमने फोटो शेअर करत तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव चहा त्यांना सांगितलं आहे. तिने लिहिलं ' पुन्हा एकदा आमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या त्या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने…एकादशीच्या पवित्र दिवशी, भगवान विष्णूंच्या कृपेने जन्मलेला आमचा दुसरा मुलगा आम्हाला एखाद्या दैवी संकेतासारखा वाटतो. त्याचा जन्म म्हणजे जणू कर्मांचा सुंदर संगम, मोठ्या भावासोबतचं एक पवित्र नातं आणि आयुष्याने दिलेला मौल्यवान आशीर्वाद आहे. खूप प्रेम आणि कृतज्ञतेसह आम्ही स्वागत करतो रुद्रलोख कपूर आहुजा.
रुद्रलोख नावाचा अर्थ काय ?
सोनमनं रुद्रलोख नावाचा अर्थही सांगितला आहे. ती म्हणाली 'वेदांमध्ये ‘रुद्र’ (रुद्र) हा शब्द ‘रुद’ या धातूपासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘गर्जना करणे’. रुद्र म्हणजे अपार शक्तीचं प्रतीक. दुःखाचं मूळापासून निवारण करणारी दैवी ऊर्जा, वादळ, श्वास, उपचार आणि नवजीवन यामागची शक्ती. '
सोनमने सांगितलं 'रुद्राचा वायूशी अत्यंत जवळचा संबंध मानला जातो. तोच प्राण, जो प्रत्येक जीवामध्ये वाहतो. आमच्या पहिल्या मुलाचं नाव ‘वायू’ आहे, जो जीवन टिकवून ठेवणाऱ्या विष्णूशी जोडलेला आहे. आणि आता रुद्रच्या आगमनाने एक पवित्र सातत्य पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.श्वास आणि शक्ती… संरक्षण आणि परिवर्तन… एकमेकांना अधिक सामर्थ्य देणारं नातं आहे. 'त्याच्या नावाप्रमाणेच रुद्र निर्भय, दयाळू, सजग आणि प्रकाश व सामर्थ्याचा स्रोत बनो, अशी आमची मनापासून इच्छा आहे.तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी मनःपूर्वक आभार. - सोनम, आनंद, वायू आणि रुद्र
चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव
सोनम कपूरच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अनेकांनी तिच्या दोन्ही मुलांना आणि सोनम आणि आनंदला आशीर्वाद दिलाय. अभिनेत्रीने दोन्ही मुलांसह फोटो शेअर केले असले तरी त्यांचे चेहरे दाखवलेले नाहीत त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
