Sonali Kulkarni Instagram Post : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलताना दिसली. 'भारतातील काही मुली या आळशी आहेत' असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. सोनालीनं आता याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.


'मला मिळत असलेल्या फीडबॅकने मी भारावून गेले आहे.  अत्यंत समंजसपणे माझ्याशी जोडल्या गेलेल्या सर्वांचे, विशेषत: संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे आभार मानू इच्छितो. मी स्वतः एक स्त्री असल्यामुळे इतर महिलांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. कौतुक करण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी  माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. आपण विचारांची अधिक मुक्त देवाणघेवाण करू शकू, अशी आशा व्यक्त करते.'


सोनाली कुलकर्णीची सोशल मीडिया पोस्ट






'माझ्या क्षमतेनुसार मी केवळ स्त्रियांशीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचा विचार करण्याचा प्रयत्न करत आहे. जर नकळत माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझ्या अंतःकरणापासून माफी मागू इच्छितो. मला खळबळजनक घटनांचे केंद्र बनायचे नाही. मी एक कट्टर आशावादी व्यक्ती आहे. माझा ठाम विश्वास आहे की, जीवन खरोखर सुंदर आहे. तुमच्या संयम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.' असाही सोनालीने पोस्टमध्ये लिहिलं.


सोनालीचं वक्यव्य


सोनालीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती म्हणते, "भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड पाहिजे किंवा असा पती हवा आहे की, ज्याच्याकडे चांगली नोकरी असेल, ज्याच्याकडे घर हवं. पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नाही की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करु शकते?"


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rajinikanth : अभिनेते रजनीकांत उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर; राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असल्याची माहिती