Sonali Khare Comeback With Marathi Serial Nashibvaan: स्टार प्रवाहवर (Star Pravah) नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली 'हळद रुसली, कुंकू हसलं' मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता 'नशिबवान' (Nashibvaan Serial) आणि 'लपंडाव' (Lapandav Serial) या नव्याकोऱ्या मालिकांच्या प्रोमोनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. नशिबवान मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवळपास 10 वर्षांनंतर त्या पुन्हा मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज आहेत. याआधी स्टार प्रवाहच्या 'बे दुणे दहा' मालिकेत सोनाली खरेनं लक्षवेधी भूमिका साकारली होती. 

Continues below advertisement


नशिबवान मालिकेच्या निमित्तानं अभिनेत्री सोनाली खरे पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहेत. उर्वशी असं तिच्या पात्राचं नाव आहे. दिसायला अतिशय सुंदर मात्र रुपाचा प्रचंड गर्व असलेली उर्वशी खूप स्वार्थी आहे. ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. भावनांना उर्वशीच्या आयुष्यात जागा नाही.


उर्वशी या पात्राबद्दल सांगताना सोनाली खरे म्हणाली की, स्टार प्रवाह परिवाराचा मी भाग होतेच पुन्हा एकदा या परिवारात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेनं झाली होती. त्यामुळे टीव्ही हे आवडतं माध्यम आहे. नशिबवान मालिकेत उर्वशी हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात दिसणार आहे. खूप उत्सुकता आहे. चित्रपट, वेबसीरिज, माझी निर्मिती संस्था यात प्रचंड व्यस्त होते. मात्र तरीही मालिकेत काम करण्याची इच्छा होती. या पात्राविषयी जेव्हा विचारणा झाली, तेव्हा मला मालिकेचा विषय आणि व्यक्तिरेखा खूपच भावली."                  


"स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्ससारखी नावाजलेली निर्मिती संस्था असा छान योग जुळून आलाय. उर्वशी अतिआत्मविश्वासू आणि स्वार्थी आहे. हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्धा आहे. त्यामुळे कस लागतोय. गणेशोत्सवाच्या धामधूमीत मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांना ही भूमिका आणि नशिबवान मालिका आवडेल याची खात्री आहे.", असं सोनाली खरे म्हणाली.                       


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Poornima Pandit Emotional Post On Jyoti Chandekar Death: 'पूर्णा आज्जीची जागा दुसऱ्या कुणाला देऊ नका...'; प्रेक्षकांचं आईवरचं प्रेम पाहून ज्योती चांदेकरांची लेक भावूक, म्हणाली...