Sonali Bendre Begins a New Journey: सोनाली बेंद्रे (Sonali bendre) प्रस्तुत करत असलेला पहिला चित्रपट 'सोहळा' (Sohala) हा 16 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रस्तुतकर्ती म्हणून तिच्या सर्जनशील प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, आशा, जिद्द आणि माणसाच्या अंतर्मनातील शांत सामर्थ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या कथेशी सोनालीने आपले नाव जोडले आहे. रोज मुव्हीज आणि कॅरीऑन (Film Presenter) फिल्म्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव (Entertainment) आणि कविता बागबान यांनी केली असून, साईकत बागबान यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
'सोहळा' या चित्रपटाद्वारे रोज मुव्हीज मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, आशा, स्वप्ने, जिद्द आणि सकारात्मकतेचा संदेश देणारी ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. 'सोहळा'च्या माध्यमातून रोज मुव्हीज आपल्या प्रादेशिक चित्रपट प्रवासाची सुरुवात करत आहे. भाषेच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या, मातीतल्या आणि प्रभावी कथा सादर करण्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनाचे हे प्रतिबिंब आहे. भारतीय मनोरंजनविश्वात प्रादेशिक चित्रपटसृष्टी सातत्याने अधिक प्रभावी ठरत असताना, उत्कृष्ट स्थानिक प्रतिभांसोबत काम करत आपल्या दर्जेदार कथाकथनाच्या परंपरेला नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा स्टुडिओचा मानस आहे.
'सोहळा' 16 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात रिलीज होणार (Sonali Bendre begins a new creative journey as presenter in Marathi Film)
'सोहळा' हा प्रस्तुतकर्ती म्हणून पहिलाच चित्रपट का निवडला, याविषयी सोनाली बेंद्रे म्हणाल्या, ‘सोहळा’ प्रस्तुत करणं माझ्यासाठी खूप खास आहे, कारण याच चित्रपटातून माझ्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात होत आहे. मला नेहमी अशाच कथा आवडतात ज्या चित्रपट संपल्यानंतरही मनात कायम राहतात... ज्या तुम्हाला थांबून विचार करायला भाग पाडतात आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतात. ‘सोहळा’ने मला नेमकं हेच दिलंय'.
पहिल्यांदा ही कथा ऐकली तेव्हाच तिच्याशी माझं एक वेगळंच नातं जुळलं. या कथेच्या केंद्रस्थानी आहे आशा, जिद्द आणि सामान्य माणसांमध्ये दडलेलं शांत सामर्थ्य. गेल्या काही वर्षांत हीच मूल्यं माझ्यासाठी अधिक महत्त्वाची झाली आहेत आणि म्हणूनच या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी ‘सोहळा’पेक्षा योग्य कथा दुसरी असूच शकत नव्हती.
प्रस्तुतकर्ती म्हणून या नव्या भूमिकेतून अशा चित्रपटांना पाठबळ द्यायचं आहे जे प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतील, तसेच अशा दिग्दर्शकांना आणि कथाकारांना व्यासपीठ मिळवून देतील ज्यांचा आवाज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा. या प्रवासाची सुरुवात ‘सोहळा’सारख्या चित्रपटातून होत असल्याचा मला खूप आनंद आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षकांनाही मला पहिल्यांदा ही कथा ऐकताना जे जाणवलं, तेच अनुभवायला मिळावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या:
