Sonali Bendre Nirma Sabun Add Video : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचे (Sonali Bendre Nirma Sabun Add Video) सिनेमे आजही लोक आवडीने पाहतात. Sarfarosh, हम साथ साथ है पासून दिलजले पर्यंत सोनाली बेंद्रेचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले होते. खासकरुन हम साथ साथ है आणि Sarfarosh या दोन्ही सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. (Sonali Bendre Nirma Sabun Add Video) मात्र, सोनाली बेंद्रे अभिनेत्री तर आहेच, मात्र तिचं मॉडेलिंग क्षेत्रात देखील तितकंच प्रभावी काम आहे. सोनाली बेंद्रेंची साबणाची एक जाहिरात संपूर्ण देशात तुफान गाजली होती. (Sonali Bendre Nirma Sabun Add Video)

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने 'निरमा' या साबणाची जाहिरात केली होती. लहानपणीची आठवण म्हणून आज देखील ही जाहिरात लोक पाहात असतात. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासह हंसिका मोटवाणी हिने देखील या साबणाच्या जाहिरातीसाठी काम केलं होतं. मात्र, सध्या सोनाली बेंद्रेची ही जाहिरात पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. 'सौंदर्य साबूण निरमा', असा खास डायलॉग या जाहिरातीमध्ये होता. 

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिने अमेरिकेत उपचार घेऊन कॅन्सरशी झुंज दिली आणि पूर्णपणे बरी होऊन भारतात परतली. कॅन्सरमुक्त झाल्यानंतर सोनाली बेंद्रेने पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात पुनरागमन केलं. सोनालीने 2022 साली ‘ब्रोकन न्यूज’ या वेब सिरीजमध्ये झळकलेली पाहायला मिळाली. सोनाली बेंद्रे वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करत असलेली पाहायला मिळाली. अलीकडेच अभिनेत्रीने अभिषेक बच्चनच्या ‘बी हॅप्पी’ या चित्रपटात एक छोटं पण लक्षवेधी कॅमिओ केलं.

दरम्यान, मोठ्या सिनेमांपासून सोनाली बेंद्रे दूर झाली असली तरी प्रेक्षकांमध्ये तिची क्रेझ आज देखील कायम असल्याचं पाहायला मिळतं. तिची जुनी गाणी, अनेक सिनेमांमधील दिलखेच अदा आजही प्रेक्षकांना भूरळ पाडतात. सोनालीची साबणाची जाहिरात देखील सध्या त्याच पद्धतीने चर्चेचा विषय बनली आहे. याशिवाय सोनालीच्या Sarfarosh मधील गाण्यांची देखील तुफान चर्चा रंगलेली पाहायला मिळते. 

Nirma Ads Beauty Soap (Ft. Sonali Bendre & Hansika Motwani)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Madhuri Dixit Intimate Scene: माधुरीसोबत इंटीमेट सीन, देहभान विसरला सुपरस्टार; दिग्दर्शक थांब-थांब म्हणाले, पण, त्यानं जबरदस्तीनं किस करताना ओठ चावले

Harshaali Malhotra Will Debut in South Movie: 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी दिसते भलतीच ग्लॅमरस, 65 वर्षांच्या हिरोसोबत स्क्रिन करणार शेअर