Harshaali Malhotra Will Debut in South Movie: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) सिनेमा 'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijaan) खूप गाजला. यामध्ये भाईजान वेगळ्या भूमिकेत चाहत्यांना पाहायला मिळाला. पण, या सिनेमात भाईजान एकटा नव्हता. तर, या सिनेमात भाईजानसोबत मुख्य भूमिकेत एक चिमुकली झळकलेली. 2015 मध्ये आलेल्या हा सिनेमा सर्वांना आवडला. सलमान खानसोबत झळकलेल्या चिमुकलीनं सर्वांना आपलंसं केलं. या चिमुकलीचं नाव हर्षाली मल्होत्रा. पण, आता  'बजरंगी भाईजान' मधली चिमुकली खूप मोठी झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आता साऊथ फिल्ममधून (South Film) डेब्यू करणार आहे. 

'बजरंगी भाईजान' मध्ये मुन्नीची भूमिका साकारणारी चिमुकली आता मोठी झाली असून लवकरच ती इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. हर्षाली एका साऊथ मूव्हीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ज्याचं नाव आहे, 'अखंड 2: थंडावम'. या सिनेमात 65 वर्षीय अभिनेता नंदमुरी बालकृष्ण (एनबीके) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात हर्षाली मल्होत्रा झळकणार असल्याची माहिती प्रोडक्शन हाऊसनं दिली आहे. 

साऊथ फिल्ममध्ये डेब्यू करणार मुन्नी 

'अखंड 2: थंडावम'च्या निर्मात्यांनी बुधवारी या सिनेमाची घोषणा केली. सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान'मध्ये लहान मुलीची मुन्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा ​​या चित्रपटात 'जाननी'ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन बोयापती श्रीनु करत आहेत. 

प्रोडक्शन हाऊस 14 रील्स प्लसनं त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ही बातमी शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय की, "एका देवदूताचं हास्य आणि सोन्याचं हृदय. अखंड 2 मध्ये बजरंगी भाईजान फेम हर्षाली मल्होत्राला 'जननी' म्हणून सादर करत आहे. अखंड 2: थांडवम 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच, दसऱ्याच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल." अशातच चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अलीकडेच, नंदमुरी बालकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये भगवान शिवाच्या भक्ताच्या रूपात त्यांचा शक्तिशाली आणि आध्यात्मिक अवतार दाखवण्यात आला होता.

टीझर पाहून स्पष्ट होतंय की, ही फिल्म रॅम-लक्ष्मण द्वारे कोरियोग्राफ करण्यात आलेली हाय-व्होल्टेज अॅक्शन सीन्सनी परिपूर्ण आहे. प्रसिद्ध संगीतकार एस. थमन, ज्यांनी बालकृष्ण यांच्या अलिकडच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट संगीत दिलंय, ते या चित्रपटासाठी संगीत देखील देत आहेत. 

अलीकडेच जॉर्जियातील एका सुंदर ठिकाणी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं. याशिवाय, या वर्षी प्रयागराज इथे झालेल्या महाकुंभमेळ्यातही चित्रपटाचे काही भाग चित्रित करण्यात आले आहेत. या अ‍ॅक्शन चित्रपटात बालकृष्ण मुख्य भूमिकेत आहेत, तर संयुक्ता देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी आदि पिनिसेट्टीची निवड करण्यात आली आहे. अखंड 2: तांडवम 25 सप्टेंबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Madhuri Dixit Intimate Scene: माधुरीसोबत इंटीमेट सीन, देहभान विसरला सुपरस्टार; दिग्दर्शक थांब-थांब म्हणाले, पण, त्यानं जबरदस्तीनं किस करताना ओठ चावले