मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात नाट्यसंमेलनात मराठी कलाकारांबाबत एक सूचक वक्तव्य केलं होतं. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जसे सुपरस्टार आहेत, तसेच मराठी सिनेसृष्टीत सुपरस्टार नाहीत, मराठी सिनेसृष्टीत कलाकार आहेत. यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही प्रतिक्रिया म्हटलं की, देत होय, हे खरंय आणि मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत देखील आहे.
मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनालीने तिचं स्थान निर्माण केलं आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या सोनाली दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिची मोहोर उमटवायला सज्ज झालीये. तिने मल्याळम सिनेमा मलईकोट्टई वालीबन या सिनेमातून सोनालीने साऊथमध्ये पदार्पण केलंय.नुकतीच सोनालीने रत्न मराठी मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान सोनालीने मराठी सिनेमे तसेच सुपरस्टार यांच्याविषयी भाष्य केलं आहे.
सोनाली कुलकर्णीनं काय म्हटलं?
मल्याळम सिनेसृष्टी देखील आपल्या मराठी सिनेसृष्टीसारखीच आहे. पण तिथे त्यांच्या भाषेला, त्यांच्या चित्रपटांना प्राधान्य आहे. तिथे कोणत्याही चित्रपगृहात आधी मल्याळम चित्रपट लागतात आणि नंतर इतर प्रादेशिक भाषांचे चित्रपट लागतात. तिथे 600 स्क्रीन्स आहेत, जिथे आधी फक्त मल्याळम सिनेमे लागतात. आपल्याकडे फक्त मराठी सिनेमांसाठी 150 स्क्रिन्ससुद्धा नाहीत. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, मराठी सिनेसृष्टीत सुपरस्टार नाहीत, कलाकार आहेत. यावर सोनालीने म्हटलं की, हो हे खरंय, यावर चर्चा होऊ शकत नाही किंवा मराठी सुपरस्टार का नाहीत याला अनेक कारणं देखील आहेत, पण मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.
राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
पुण्यात 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांची देखील मुलाखत घेण्यात आली. तेव्हा राज ठाकरेंनी म्हटलं की, आपल्या मराठी सिनेसृष्टीत सुपरस्टार नाहीत, आपल्या मराठी सिनेसृष्टीत कलाकार आहेत.
सोनाली कुलकर्णीचा अभिनयाचा प्रवास
सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत. तसेच सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिची मोहोर उमटवली आहे.