Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या जटाधारा चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.. या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच काळापासून आतुरतेने प्रतीक्षा होती. सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांच्या सुपरनॅचरल अॅक्शन थ्रिलर जटाधाराचा टीझर आज (दि.8) प्रदर्शित झाला. शुक्रवारी चित्रपट निर्मात्यांनी हा टीझर रिलीज करताच प्रेक्षकांचा उत्साह सातव्या आसमानावर पोहोचला.
चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने हा टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे, “बलिदानातून जन्मलेला एक नायक—आणि लोभातून वाढलेलं अंधाराचं साम्राज्य, संघर्षाची सुरुवात झाली आहे—‘जटाधारा’चा टीझर आता प्रदर्शित झाला आहे.” टीझरमध्ये सोनाक्षी एक प्रभावी लूकमध्ये पाहायला मिळत आहे. दागदागिने, डोळ्यात काजळ, लाल टिकली आणि कपाळावरचा टिकला यांमळे सोनाक्षी सिन्हाचा रौद्र चेहरा उठून दिसतोय.
जटाधारामध्ये सोनाक्षीचा पूर्णपणे वेगळा अंदाज पाहायला मिळतो. या चित्रपटात सुधीर बाबू देखील प्रमुख भूमिकेत आहे. टीझरमध्ये सुधीर आणि सोनाक्षी एकमेकांना भिडताना दिसतात. वेंकट कल्याण आणि अभिषेक जायसवाल यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला जटाधारा हा अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेला एक मनोरंजक चित्रपट आहे. टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे आणि आता त्यांना ट्रेलरची उत्कंठा लागली आहे. हा चित्रपट भारतीय पौराणिक कथांवर आधारित असून, कथेबाबतचे अधिक तपशील ट्रेलरमध्ये दिसतील.
सोनाक्षीचा लूक ठरला चर्चेचा विषय
याआधी चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर इंस्टाग्रामवर प्रदर्शित करण्यात आला होता. यात सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हाचा अलौकिक अवतार दिसून आला होता. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं होतं, “ प्रतिक्षा संपली, पौराणिकतेने भरलेल्या भव्य दृश्यांचा साक्षीदार व्हा—‘जटाधारा’! सुधीर बाबू, सोनाक्षी सिन्हा आणि भगवान शंकराची झलक स्क्रीनवर आग लावणारी आहे. प्रेरणा अरोरा इंडियन सिनेमाला नव्या पद्धतीने सादर करणार आहेत.”
या वर्षाच्या अखेरीस होणार प्रदर्शित
हा चित्रपट जी स्टुडिओच्या निर्मितीत आणि एस के जी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार केला जात आहे. चित्रपटात भव्य व्हीएफएक्सचा समावेश असेल. संगीत जी म्युझिक कंपनीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित करण्याची योजना आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'सलमान खानसोबत काम केलं तर ..', कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी, ऑडिओ क्लीप समोर
स्मृती ईराणी बनल्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टिव्ही अभिनेत्री, एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात?