Sneha Wagh On Mumbai: सिनेसृष्टी किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकजण आपलं स्वप्न सत्यात उतरवतात, पण कित्येकांना स्ट्रगल करावं लागतं. पण, काहीजण आपल्या टॅलेंटच्या जोरावर यशाचं सर्वोच्च शिखर गाठतात. त्यापैकी एक नाव म्हणजे, स्नेहा वाघ. बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) स्नेहा वाघनं (Sneha Wagh) मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. पण, त्यासोबतच तिनं हिंदीतही भरपूर काम केलं. सध्या स्नेहा अध्यात्माकडे वळलीय. मुंबईची असलेली स्नेहाचं सध्या मुंबईत मन लागेनासं झालंय, ती मुंबईपेक्षा जास्त उत्तरप्रदेशात रमतेय. 

Continues below advertisement

मज्जा पिंकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्नेहा वाघ म्हणाली की, "मी सगळ्या देवांना डिस्टर्ब करायचे. म्हणजे मी देवीचं पण नमन करायचे, शंकराचं पण नमन करायचे, विष्णू यांचं नमन करायचे. बागेश्वर धाम महाराज जे आहेत तिथे त्यांचे व्हिडिओ बघायचे. ते व्हिडिओ पाहताना मला खूप मजा यायची. प्रेमानंद महाराज यांचे सुद्धा व्हिडिओ पाहताना मला खूप मजा यायची. सकाळी आणि रात्री माझा 30 मिनिटांचा वेळ ठरलेला असायचा की हे सगळं देवांचं नमन करायचं आणि मगच झोपायचं. या सगळ्यामुळे मला बोलायची सवय झाली म्हणजे आज काय झालं तर ते रात्री सांगायचं..."

मला मुंबई आपली वाटली नाही... : स्नेहा वाघ

"काही चुकीचं झालं की मला देवावरच राग यायचा. पण मी सगळ्या देवांना त्यावेळी डिस्टर्ब करायचे. मला असं वाटतं की ते कुठेतरी मॅनिफेस्टेशन झालं. मला वृंदावनचं आमंत्रण आलं. मी तिथे गेले, तीन दिवसात माझ्यासोबत इतक्या गोष्टी घडल्या की मी जेव्हा परत आली तेव्हा मला मुंबई आपली वाटली नाही. माझं घर माझं असं वाटलं नाही. मला माझा बेड सुद्धा स्वतःचा आहे असं वाटलं नाही. मला झोपताही यायचं नाही. मी सकाळी पाच वाजता उठायचे आणि म्हणायचे की मी चुकीच्या जागेवर आहे. मला वृंदावनला जायचं आहे...", स्नेहा वाघ म्हणाली. 

Continues below advertisement

पुढे बोलताना स्नेहा वाघ म्हणाली की, "वृंदावनला सकाळी पाच वाजता मंगल आरती होते. मी मुंबईत उठायचे आणि फोनवर चेक करायचे की कुठे मंगल आरती दिसते का पाहायला वगैरे... मला नाहीच जमलं इथे राहणं. पंधरा-वीस दिवस मी कसेबसे काढले. नंतर मी मम्मीला सांगितलं की तिथे प्रागट्य महोत्सव होतोय मी जाते... तेव्हा मम्मीला वाटलं की ही जाईल आणि आठवड्याभरात जशी येते तशी परत येईल. मी गेले ते तीन महिने आलेच नाही. मी तिकडे गेले आणि वृंदावन मध्ये जी रमले तेव्हा मला वाटू लागलं की बस! हेच आपलं आयुष्य आहे , हीच आपली दुनिया आहे आणि हे सगळं काही आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Marathi Actor Angry On Who Burst Crackers Late Night: 'तू जाणारेस नरकात...'; रात्री-बेरात्री फटाके फोडणाऱ्यांवर मराठी अभिनेत्याचा संताप, थेट विराट कोहलीचं नाव घेत म्हणाला...