Smriti Mandhana Latest Instagram Post: भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचं लग्न गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरलेलं. अनेक बातम्या, चर्चा झाल्या. त्यानंतर स्मृतीनं स्वतः यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि पलाशसोबतचं लग्न मोडल्याचं जाहीरपणे सांगितलं. अशातच आता स्मृतीनं आणखी एक पोस्ट केली आहे. ज्या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच, स्मृतीनं ही पोस्ट शेअर करताना दिलेलं कॅप्शनही चर्चेचा विषय ठरतंय. 

Continues below advertisement

स्मृती मानधनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यानं कॅप्शन लिहिलंय की, "माझ्यासाठी मौन म्हणजे, शांतता नव्हे... नियंत्रण आहे..." स्मृतीच्या या पोस्टला काही तासांतच 8 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ज्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या परिस्थितीबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. काहीजण स्मृतीची पोस्ट म्हणजे, सूचक इशारा असल्याचं बोललं जात आहे. 

स्मृती मानधनाची ही पोस्ट एका लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडच्या सशुल्क प्रमोशनचा भाग होती. स्मृती मानधनानं यापूर्वी 7 डिसेंबर रोजी एका पब्लिक स्टेटमेंटद्वारे पलाशसोबतच्या लग्नावर तिचं मौन सोडलं. तिनं लग्न मोडल्याचं ऑफिशिअली जाहीर केलं. त्यासोबतच तिनं दोन्ही कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी विनंतीही केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच स्मृती आणि पलाशनं आपलं नातं सर्वांसमोर जाहीर केलेलं. गेल्या बऱ्याच काळापासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या. दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर दोघांची लगीनघाई सुरू झालेली.  पण, लग्नाच्या आदल्या दिवशीच काहीतरी घडलं आणि लग्न पुढे ढकलल्याचं सांगितलं जाऊ लागलं. खूप चर्चा झाल्या, वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात आले आणि अखेर स्मृतीनंच या सर्व चर्चांवर मौन सोडलं आणि पलाशसोबतचं लग्न मोडल्याचं जाहीर केलं.                                       

महत्त्वाच्या इतर बातम्या :                        

Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या