Smriti Mandhana Trolled for Outfit: 23 नोव्हेंबर 2025 रोजी महिला संघातील स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं. दोघांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. काही मीडिया रिपोर्ट्सने असा दावा केला की, पलाश मुच्छलने स्मृतीची फसवणूक केली. या कारणामुळे लग्न मोडलं. सोशल मीडियावर अनेक दिवस याबाबत अफवा पसरल्या होत्या. याच अफवांवर पूर्णविराम देण्यासाठी स्मृती आणि पलाशने पोस्ट करून लग्न मोडलं असं जाहीर केलं. दरम्यान, लग्न मोडल्याच्या काही दिवसांनंतर स्मृती पु्न्हा मैदानात परतली. मैदानावर सरावाचे पोस्ट मानधना सोशल मीडियावर शेअर करत असते.
अलिकडेच तिनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी तिनं खास सफेद रंगाचा हॉल्टर नेक वन पीस परिधान केला होता. या ड्रेसवरून तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं. तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. स्मृती या ड्रेसमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. या ट्रोलर्सना कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर हिनं सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत स्मृतीला ट्रोल करणार्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
स्मृतीला तिच्या बायसेप्सवरून ट्रोल करण्यात आलं. तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. अंकिताने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून बॉडी शेमिंग करणार्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं लिहिलं की, "भारत देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूला शरीरावरून नाही तर, योगदानावरून मोजा. कुणाच्याही शरीरावर टिप्पणी करणे थांबवा. तिच्या कामगिरीचा आदर करायला सुरूवात करा", असं म्हणत अकिंतानं ट्रोलर्सला निशाण्यावर धरलं. सध्या कोकण हार्टेड गर्लची ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
स्मृतीची सलमान खानशी करण्यात आली तुलना
स्मृतीने अलिकडेच बंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिनं या कार्यक्रमासाठी खास सफेद रंगाचा हॉल्टर नेक वन पीस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये स्मृती सुंदर दिसत होती. तिचे या ड्रेसवरचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. तिची तुलना सलमान खानशी करण्यात आली होती. सलमानचा सफेद रंगाच्या ड्रेसवरील फोटो आणि स्मृतीचा फोटो कोलाज करून व्हायरल करण्यात आला. नंतर नेटकऱ्यांनी स्मृतीलाशारीरिक ठेवणीवरून ट्रोल केलं. याच पोस्टवरून अंकिताने ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला.