Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांत सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) वैयक्तिक आयुष्यात झालेला मोठा बदल. 23 नोव्हेंबरला अचानक तिचं आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं नातं तुटल्याची बातमी समोर आली. काही तासांतच लग्न मोडलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या.मात्र, दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया येत नव्हती. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर स्मृती आणि पलाशकडून नातं संपल्याचं अधिकृतपणे जाहीर झालं आणि त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. स्मृतीच्या या निर्णयात टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी स्मृतीच्या मागे खंबीरपणे उभा राहायचं ठरवलंय. स्मृतीची जिवलग मैत्रीण आणि टीम इंडियाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने एक क्रिप्टिक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
जेमिमा रॉड्रिग्सची क्रिप्टिक पोस्ट
दरम्यान, स्मृतीची जिवलग मैत्रीण आणि टीम इंडियाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण, स्मृतीच्या नात्यातील निर्णयासोबतच जेमिमाने केलेली एक क्रिप्टिक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. जेमिमाने इंस्टाग्रामवर एका बँडचं गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला असून त्या गाण्यातील बोल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. “Man I Nee” हे गाणं हा बँड गातोय. या गाण्यातील बोल स्मृतीच्या परिस्थितीशी जुळत असल्याचं चाहत्यांचं मत आहे. काहींनी तर या गाण्याला थेट स्मृती आणि पलाशच्या नात्याशी जोडलं आहे.
टीम इंडियाच्या 10 क्रिकेटपटूनी केलं पालाशला अनफॉलो
जेमिमाने व्हिडिओच्या थंबनेलवर लिहिलेलं वाक्य यामुळे पोस्टवरील चर्चा अधिक रंगल्या आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी जेमिमाच्या पोस्टला स्मृतीसाठीचा पाठिंबा देत असल्याचं म्हणत आहेत. त्यात भर म्हणजे, जेमिमासह टीम इंडियाच्या दहा महिला क्रिकेटपटूंनी पलाश मुच्छलला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत स्मृती मंधाना, रेणुका सिंह ठाकुर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, राधा यादव, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, शिवाली शिंदे आणि यास्तिका भाटिया यांचा समावेश आहे.
टीम इंडिया स्मृतीच्यामध्ये खंबीरपणे उभी
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांची पहिली भेट 2019 मध्ये मुंबईत झाली होती. एका कॉमन मित्राच्या ओळखीमुळे सुरू झालेली त्यांची मैत्री पाच वर्षांच्या नात्यात रूपांतरित झाली. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्याचंही जवळच्या सूत्रांनी सांगितलं होतं. मात्र परिस्थितीनं वळण घेतलं आणि हे नातं अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच तुटलं. स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्यातील या निर्णयानंतर तिचे सहखेळाडू मानसिक पाठिंबा देत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. जेमिमाची पोस्ट आणि खेळाडूंनी केलेली ‘अनफॉलो’ अॅक्शन यावरून महिला टीम तिच्यासोबत उभी आहे, असं चाहते म्हणत आहेत.