Smriti Irani On Akshaye Khanna Performance In Dhurandhar: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सिनेमानं ताबा मिळवलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'धुरंधर'मध्ये लीड रोलमध्ये बॉलिवूडचा (Bollywood News) एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) दिसलाय. पण, त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा होतेय ती, अक्षय खन्नाची (Akshaye Khanna). या सिनेमानं बॉक्स ऑफिस आपल्या ताब्यात घेतलं आहे. सर्वच स्टारकास्ट जबरदस्त दिसलीय. 'धुरंधर' पाहताना अक्षय खन्नावरुन नजर हटवणं जवळपास अशक्यच. अशातच आता अक्षय खन्नाला ऑस्कर देण्याती मागणी केली जातेय.
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शिका फराह खाननं अक्षय खन्नाला 'ऑस्कर' देण्याची मागणी केली होती आणि आता भाजप नेत्या, अभिनेत्री स्मृती इराणी यांनीही खास पोस्ट लिहून अक्षयचं कौतुक केलं आहे. तसेच, याला ऑस्कर देऊन टाका रे, अशी पोस्टही केली आहे.
स्मृती इराणी काय म्हणाल्या?
स्मृती इराणी यांनी 'तीस मार खान' चित्रपटातील अक्षय खन्नाची एक व्हायरल क्लिप शेअर केली आहे. या क्लिपसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "जेव्हा अक्षय खन्नानं सगळ्यांच्या अपेक्षा ओलांडून भन्नाट काम केलंय, तेव्हा तुम्हालाही मोठ्यानं ओरडून सांगावंसं वाटेल... त्याला ऑस्कर देऊन टाका..."
'धुरंधर' सिनेमातल्या भूमिकेनं अक्षय खन्नानं सर्वांना वेड लावलंय. सिनेमात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकलाय, पण त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा आणि कौतुक अक्षय खन्नाचं होतंय. अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच स्मृती इराणींपूर्वी बॉलिवूडची सुप्रसिद्ध निर्माती फराह खाननंही अक्षय खन्नाला ऑस्कर देण्याची मागणी केलेली.
फराह खानही म्हणालेली, "ऑस्कर द्या..."
फराह खाननं 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक केलंय आणि त्याला ऑस्कर देण्याची मागणी केली आहे. फराह खाननं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अक्षय खन्ना एका बाजूला 'रहमान डकैत'च्या भूमिकेत दिसतोय, त्याच्याच खाली अक्षय खन्नाचा आणखी एक जुन्या सिनेमातला फोटो आहे. अक्षय खन्नाचा तो फोटो फराह खानच्या 'तीस मार खान' सिनेमातला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना फराह खाननं लिहिलंय की, "अक्षय खन्ना, तू खरोखरंच ऑस्करला पात्र आहेस..."