Sitaare Zameen Par BO Day 9: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Kham) फिल्म 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. 20 जून रोजी रिलीज झालेला सिनेमा पाहता पाहताच दिग्गजांच्या चित्रपटांना पछाडून थेट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. जाणून घेऊयात फिल्मनं किती कोटींची कमाई केली, त्याबाबत सविस्तर... 

'सितारे जमीन पर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅक्निल्कनं दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटानं नवव्या दिवशी 12.75 कोटींचं कलेक्शन केलं आहे. चित्रपटाच्या नवव्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. पण, जर दुसऱ्या शनिवारी चित्रपटानं 12.75 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. तर, सिनेमाच्या एकूण कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, सिनेमानं आजपर्यंत 108.30 कोटींचं कलेक्शन केलं आहे. 

'सितारे जमीन पर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

Sacnilk च्या वृत्तानुसार, चित्रपटानं नवव्या दिवशी 12.75 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या नवव्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे अद्याप अधिकृत नाहीत. पण जर दुसऱ्या शनिवारी चित्रपटानं 12.75 कोटी रुपये कमावले असतील, तर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 108.30 कोटी झालं आहे.

'गजनी'चा रेकॉर्ड मोडण्यापासून दूर 

यासह, हा चित्रपट आमिर खानच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट बनला आहे. जर चित्रपट अशीच कमाई करत राहिला तर, लवकरच 'सितारे जमीन पर', 'गजिनी'चा रेकॉर्ड मोडेल. 'गजिनी'चं लाईफटाईम कलेक्शन 114 कोटी आहे. त्याच वेळी, आमिर खानने सनी देओलच्या 'जाट'चा रेकॉर्डही मोडला आहे. 'जाट'चा आजीवन कलेक्शन 88.26 कोटी रुपये होता. त्याच वेळी, अक्षय कुमारचा 'केसरी 2' देखील मागे पडला आहे. अक्षय कुमारच्या 'केसरी 2'चा आजीवन कलेक्शन 92.53 कोटी रुपये होता.

'सितारे जमीन पर'चं कलेक्शन किती? 

'सितारे जमीन पर'च्या दरदिवसाच्या कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, सिनेमानं 10.7 कोटींची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 20.2 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी चित्रपटानं 27.25 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी 8.5 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशीही या सिनेमानं 8.5 कोटींची कमाई केली. सहाव्या दिवशी चित्रपटानं 7.25 कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचं एकूण कलेक्शन 88.9 कोटी होतं. आठव्या दिवशी चित्रपटानं 6.65 कोटींची कमाई केली.                                                 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अमिताभ बच्चन यांनी नेपाळमध्ये शूट झालेल्या सिनेमात केला होता ट्रीपल रोल, 3 कोटीचं खर्च झाले अन् चित्रपटाने कमावले 8 कोटी