Sitaare Zameen Par Box Office Collection Day 10: आमिर खानच्या (Aamir Khan) 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) या चित्रपटानं आज बॉक्स ऑफिसवर 10 दिवस पूर्ण केले आहेत. या चित्रपटानं या दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, तसेच एकापाठोपाठ एक असे अनेक मोठ्या सिनेमांच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूरही केला.  

आमिर खानचा चित्रपट रिलीज होऊन आज दोन आठवडे उलटले. आज दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला झाला आहे आणि प्रेक्षकांनी पुन्हा एकदा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली आहे. फिल्मच्या सुरुवातीच्या कलेक्शनचा डेटा येताच, या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत 'सितारे जमीन पर'नं मानाचं स्थान मिळवलं आहे. 

'सितारे जमीन पर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? 

सॅकनिल्कच्या मते, 'सितारे जमीन पर' ने पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 दिवसांत 88.9 कोटी रुपये कलेक्शन केले. आठव्या आणि नवव्या दिवशी चित्रपटाची कमाई अनुक्रमे 6.65 कोटी आणि 12.6 कोटी रुपये होती. त्याच वेळी, आज सकाळी 10:20 वाजेपर्यंत, त्याने 14.50 कोटी रुपये कमावले आहेत आणि एकूण 122.65 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. सॅक्निल्कवर उपलब्ध असलेले आकडे अंतिम नाहीत. त्यात बदल होऊ शकतात.

'सितारे जमीन पर' हा वर्षातील चौथा सर्वात मोठा चित्रपट 

या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत, 'छावा' (601.54 कोटी रुपये), 'हाऊसफुल' (193.39 कोटी रुपये) आणि 'रेड 2' (173.05 कोटी रुपये) नंतर, आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चौथा सर्वात मोठा कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

जर चित्रपटाची अशीच कमाई सुरू राहिली तर 'रेड 2' चा रेकॉर्डही धोक्यात येऊ शकतो. तुम्हाला सांगतो की, या स्थानावर पोहोचण्यापूर्वीच या चित्रपटानं 'स्काय फोर्स' (112.75 कोटी रुपये) आणि 'सिकंदर' (110.1 कोटी रुपये) यांचे रेकॉर्ड विक्रम मोडले आहेत.

'सितारे जमीन पर'नं भांडवलं वसूल केलं? 

रिपोर्ट्सनुसार, आमिर खानच्या चित्रपटाचं बजेट सुमारे 90 कोटी आहे. सॅक्निल्कच्या मते, चित्रपटानं 9 दिवसांत जगभरात 165.50 कोटींची कमाई केली आहे. जर आपण चित्रपटाचं कालचं कलेक्शन यात जोडलं तर, ते सुमारे 180 कोटींवर पोहोचतं, म्हणजेच चित्रपटानं त्याच्या बजेटच्या दुप्पट म्हणजेच 200 टक्के कमाई केली आहे.

'सितारे जमीन पर'चं दिग्दर्शन 'शुभ मंगल सावधान' बनवणारे दक्षिणेकडील दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनी केलं आहे. या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे आणि जिनेलिया देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय, 10 खास स्टार्सनीही चित्रपटात काम केलं आहे. चित्रपटाचे रिव्यू खूप चांगले आहेत आणि प्रेक्षकांच्या पॉजिटिव वर्ड ऑफ माऊथमुळे, चित्रपट बराच काळ चित्रपटगृहांमध्ये राहील.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Paresh Rawal Returns To Hera Pheri 3: गूड न्यूज! 'हेरा फेरी 3'मध्ये बाबू भैय्यांची वापसी; अक्षय कुमारसोबतचं भांडण मिटलं?