Paresh Rawal Returns To Hera Pheri 3: गेल्या काही दिवसांपासून परेश रावल (Paresh Rawal) यांची कॉमेडी फिल्म 'हेरा फेरी 3'मध्ये (Hera Pheri 3) वापसी झाली आहे. दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी स्वतः माहिती दिलीय की, पुन्हा एकदा ते फिल्ममध्ये बाबू भैय्यांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. परेश रावल यांनी अक्षय कुमारसोबतच्या (Akshay Kumar) वादावरही भाष्य केलं आहे. तसेच, आता वाद मिटला असून सर्वकाही ठीक आहे, असं परेश रावल यांनी सांगितलं आहे.
बॉलीवूड हंगामासोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना स्वतः परेश रावल यांनी पुष्टी केली की, ते 'हेरा फेरी 3' करण्यास तयार झाले आहे. अक्षय कुमारसोबतच्या भांडणाबद्दल परेश रावल म्हणाले की, "खरं तर कोणताही वाद नाही. जेव्हा एखादा प्रोजेक्ट प्रेक्षकांना इतका आवडतो, तेव्हा तो अधिक काळजीपूर्वक हाताळावा लागतो."
"आता सर्वकाही ठीक..."
पुढे बोलताना परेश रावल म्हणाले की, "जनतेनं आम्हाला प्रेम दिलंय आणि त्यासोबतच जबाबदारीही येते. आपण ते कधीही हलक्यात घेतलं नाही पाहिजे. सर्वोत्तम काम करण्याचं कर्तव्य मानतो. मला फक्त असं वाटलं की, सर्वांनी एकत्र येऊन आपले सर्वोत्तम प्रयत्न द्यावे. हीच एकमेव चिंता होती. पण आता सर्वकाही ठीक आहे. सर्वकाही ठीक होणार होतं. आम्हाला फक्त काही फाइन-ट्युनिंगची आवश्यकता होती. शेवटी, प्रियदर्शन, अक्षय आणि सुनील हे सर्वजण क्रिएटिव्ह आहेत आणि बऱ्याच काळापासून मित्रही आहेत."
परेश रावल यांनी सायनिंग अमाऊंट परत केली
या वर्षीच मे महिन्यात परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' मधली एग्जिट कंफर्म केली. असंही वृत्त समोर आलेलं की, अभिनेत्यानं त्याची सायनिंग अमाऊंट 11 लाख रुपये 15 टक्के व्याजासह परत केली आहे. त्यानंतर फ्रँचायझीचे हक्क खरेदी करणाऱ्या अक्षय कुमारनंही त्याच्याविरुद्ध ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केस दाखल केलेला. चाहत्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी परेशच्या 'हेरा फेरी 3'मधून बाहेर पडण्यावर निराशा व्यक्त केली.
दरम्यान, प्रियदर्शन 'हेरा फेरी 3'चं दिग्दर्शन करत आहेत आणि फिरोज नाडियाडवाला या चित्रपटाचे निर्माते आहेत. पुन्हा एकदा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट या चित्रपटात दिसणार आहे. सध्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :