Singer Soraya Nieto Attacked With Glass: साऊथ अमेरिकेतील (South America) पेरु येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे.  पेरु येथील स्थानिक महोत्सवात सादरीकरण करत असताना  गायिका सोराया निएटो (Soraya Nieto) हिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.  गायिकेवर काचेची बॉटल फेकण्यात आली आहे.  ही भयंकर घटना पेरुच्या आयाकुचो डिपार्टमेंट  येथील प्रोविंसच्या ओक्रोस डिस्ट्रिक्ट (Entertainment) स्थित चुम्बोस नावाच्या एका जागेवर घडली.  हल्ल्याच्या घटनेनंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड  व्हायरल झाला. यानंतर गायिकेच्या चाहत्यांनी या घटनेवर संतार व्यक्त केला.   सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

Continues below advertisement

व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की, कशा पद्धतीने गर्दीतून गायिकेवर बॉटल फेकण्यात आली.  नीटोचा कार्यक्रम अपेक्षापेक्षा अधिक वेळ चालल्यामुळे  बाटली फेकणारी व्यक्ती गायिकेवर रागावली होती. या कारणास्तव तिच्यावर बॉटल फेकण्यात आली.  त्याने काचेची बाटली थेट स्टेजच्या  दिशेनं फेकली.  ही काचेची बाटली गायिकेच्या चेहऱ्यावर लागली.  तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या.  यामुळे गायिकेच्या डाव्या पापणीवर व्रण,  भूवईभोवती  सूज आणि खालच्या ओठाखाली एक खोल जखम झाली आहे.  ज्यावर टाके घालावे लागले.  सुदैवाने तिच्या डोळ्यांवर जखम झाली नाही.

'एल हेराल्डो डी मेक्सिको' मधील एक वृत्तानुसार, 'रक्तस्त्राव होत असल्यामुळे तेथील परिसरातील लोक आणि मित्र तात्काळ मदतीसाठी धावून आले.  ते लोक माझ्या मदतीसाठी धावून आले. मी त्यांचे आभार मानते', असं गायिका म्हणाली.  दरम्यान, त्याच ठिकाणी दुसऱ्या मंचावर सादरीकरण करणाऱ्या  संगीतकाराने आणि कलाकाराने तिला मदत न केल्याबद्दल गायिकेने नाराजी व्यक्त केली.  मदतीला न येता त्यांनी आपले सादरीकरण सुरुच ठेवले.  

गायिका Soraya Nietoवर प्राणघातक हल्ला, नेमकं घडलं काय? (Singer Soraya Nieto Attacked With Glass Bottle)

दरम्यान, शारीरिक हल्ल्यासंदर्भात गायिका आता संबंधित अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करणार आहे.  यावेळी तिने सोशल मीडियावरील चाहत्यांचेही आभार मानले.   तसेच तिने  पुढील कायदेशीर कारवाईबाबत वेळोवेळी  माहिती देत राहणार असल्याचं नीटोने सांगितलं.  या प्रकरणानंतर  सोशल मीडियात अक्षरश: खळबळ उडाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’