Singer Lucky Ali On Bollywood: लकी अली (Lucky Ali), भारतातील दिग्गज गायकांच्या (Legendary Singers Of India) यादीतलं एक नाव. त्यांचा आवाज, त्यांची गाणी याचा मोठा चाहतावर्ग आहे. 1996 मध्ये लकी अली यांनी आपला पहिला अल्बम सुन्नो रिलीज केला होता. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत कहो ना... प्यार है (2000) फिल्ममध्ये प्लेबॅक डेब्यू केला. ज्यामध्ये त्यांचं 'ना तुम जानो ना हम' गाणं सुपरहिट ठरलं होतं. त्यानंतर त्यांनी ओ सनम, एक पल का जीना, सफरनामा यांसारखी सुपरहिट गाणी गायली. पण, कधीकाळी बॉलिवूडमध्ये गाजलेली गाणी देणाऱ्या लकी अलींनी बॉलिवूडपासून स्वतःला दूर केलं. याचं कारण त्यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना दिलं होतं. 

Continues below advertisement

बॉलिवूडचे लोक खूप उद्धट... : लकी अली 

एका जुन्या मुलाखतीत बोलताना सुप्रसिद्ध गायक लकी अली यांनी बॉलिवूडबाबत भाष्य केलं. तसेच, हिंदी सिनेसृष्टीत नावारुपाला आल्यानंतरही इथून स्वतःला दूर करण्याचं कारण सांगितलेलं. लकी अली म्हणाले की, "बॉलिवूडचे लोक खूप उद्धट (बदतमीज़ी) आहेत. हल्ली ज्या फिल्म्स बॉलिवूडमध्ये बनतायत, त्यातून काहीच प्रेरणा मिळत नाही आणि ना त्यातून काही शिकण्यासारखं आहे..."  

लकी अली पुढे बोलताना म्हणाले की, "सध्याच्या बॉलिवूड फिल्म्समधून व्हॉयलन्स, इम्पेशन्स आणि लोभ यांना प्रोत्साहन दिलं जातंय, जे समाजाला चुकीच्या दिशेनं नेत आहेत. यामुळेच त्यांनी बऱ्याच काळापासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणं थांबवलं आहे आणि इंडस्ट्रीपासून स्वतःला शक्य तितकं दूर ठेवलं आहे.

दरम्यान, 2024 मध्ये 'दो और दो प्यार' चित्रपटातील 'तू है कहां' गाण्यानं लकी अली जवळजवळ एक दशकानंतर बॉलिवूड प्लेबॅक सिंगिंगमध्ये परतले होते. याव्यतिरिक्त ते आपल्या कॉन्सर्ट्स आणि अल्बम्ससह चाहत्यांशी कनेक्ट राहतात. अलिकडेच, त्यांनी डोंगररांगांमधल्या रस्त्यावर क्रूझर बाईक चालवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांचं 'कितनी हसीन जिंदगी' हे गाणं बँकग्राऊंडला वाजत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sanjay Mishra Buys Sea Facing Apartment In Mumbai: कधीकाळी 150 रुपये रोज काम करायचा 'हा' अभिनेता, आज मुंबईत खरेदी केलंय 4.75 कोटींचं सी फेसींग अपार्टमेंट