Singer KK Last Song :  केके या नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले.  केके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. कार्यक्रमादरम्यान मंचावरच हृदयविकाराचा झटका आला असून नझरूल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जेव्हा केके सुमारे एक तास गाऊन त्यांच्या हॉटेलवर परतले, तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. सुत्रांच्या माहितीनुसार, KK यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. KK यांनी मृत्यूपूर्वी कॉन्सर्टमध्ये जे गाणे गायले, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत


शेवटच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ शेअर


गायक केके यांच्या शेवटच्या परफॉर्मन्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. कॉन्सर्ट दरम्यान केके म्हणाले, "हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल...',



कॉन्सर्टचा व्हिडिओ व्हायरल


सोशल मीडियावर गायक केकेंच्या निधनानंतर त्यांचे चाहते शोक व्यक्त करताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्याच्या शेवटच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ सर्वाधिक पाहिले जात आहेत. केके यांच्या निधनाने बॉलिवूडला दु:ख झाले आहे. केके यांच्या निधनाबद्दल चित्रपट अभिनेता अक्षय कुमारपासून अनेक टेलिव्हिजन स्टार्सनी शोक व्यक्त केला.


सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायकांपैकी केके एक आहेत. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.


केके बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केके यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.  'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "केके यांच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. त्यांच्या गाण्यांमधून अपार भावना प्रदर्शित व्हायच्या. सर्व वयोगटातील लोकांमध्ये त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यामध्येच असतील, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत राहतील. केके यांच्या कुटुंबाप्रति आणि त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सामील आहे."


 






अनेक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड


53 वर्षीय केकेने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. काईट्स चित्रपटातील ‘जिंदगी दो पल की’, ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘आँखों में तेरी’, ‘बचना ए हसीनो’ चित्रपटातील ‘खुदा जाने’, ‘तडप तडप’ या चित्रपटातील गाण्यांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे