Arya Ambekar Entry In Marathi Serial Kamali: "कमळी" सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळण, पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांतील चढ-उतार यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच, आता मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे, जी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिची ‘अनामिका’ या भूमिकेतून मालिकेत विशेष एन्ट्री झाली आहे. 

Continues below advertisement

अनामिका ही धाडसी, सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी असून, तिच्या स्वभावामुळे कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे. या खास भागांच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल आर्या आंबेकर म्हणाली , 'मला Ocean Film Company कडून या खास भूमिकेसाठी  फोन आला होता. एका कॉलेजमधील म्युझिक टीचर, म्हणजेच संगीत प्राध्यापकाची भूमिका करण्याबद्दल त्यांनी विचारलं. अभिनय आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध आहे असं मी नेहमी मानते, विशेषतः संगीताशी संबंधित भूमिका करताना... त्यामुळे मला ही भूमिका लगेच आवडली आणि मी होकार दिला', असं आर्या आंबेकर म्हणाली. 

'कमळीच्या टीमसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता' - (Aarya Ambekar On Marathi Kamli Serial)

'झी मराठी हे माझ्यासाठी नेहमीच खूप खास व्यासपीठ राहिलं आहे. माझ्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे इथेच घडले. मी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स ’मध्ये स्पर्धक होते आणि नंतर परीक्षक म्हणूनही काम केलं. झी मराठीच्या चित्रपटांमध्येही मी काम केलं आहे, इथेच माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला, तसेच त्यांच्या मालिकांसाठी मी शीर्षक गीत  आणि प्रेमगीतेही गायली आहेत. त्यामुळे झी मराठी मला घरासारखं वाटतं. म्हणून ही संधी स्वीकारणं माझ्यासाठी खूप सोपं होतं. माझ्या व्यक्तिरेखेचं नाव ‘अनामिका’ आहे. ती खूप धाडसी आणि सकारात्मक मुलगी आहे. तिचे संवाद खूप ठाम आहेत. जे आपण खऱ्या आयुष्यात सहज बोलत नाही. मी स्वतः थोडी लाजरी आहे, पण अनामिका खूप व्यक्त होणारी आणि निडर आहे. ती तिचं मत स्पष्टपणे मांडते आणि कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण करण्यात तिची मोठी भूमिका असणार आहे', असंही आर्या म्हणाली.

Continues below advertisement

'कमळीच्या टीमसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. संपूर्ण प्रोडक्शन खूप नियोजनबद्ध आहे आणि कलाकारांची पूर्ण काळजी घेतली जाते. अप्रतिम  सोयीसुविधा दिल्या जातात. सेटवरील वातावरण खूप सकारात्मक असतं, दिग्दर्शक, क्रिएटिव्ह टीम आणि प्रोडक्शन टीम सगळेच उत्कृष्ट आहेत. माझ्या व्यक्तिरेखेत गाण्यालाही महत्त्व होतं. मी या खास भागांमध्ये काही गाणीही गायली आहेत ', असं आर्या मालिकेत भूमिका सादर करत असताना आलेल्या अनुभवांबद्दल म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ मधून एक्स्ट्रा मनोरंजन