Sikandar Worldwide opening day Box Office Collection: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar Movie) 30 मार्च रोजी थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आला. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी भाईजानचा चित्रपट पहिल्या दिवशी इतिहास रचेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. तसेच, 2025 च्या सर्वात मोठ्या ओपनरचा मान मिळालेल्या 'छावा'ला (Chhaava) 'सिकंदर' (Sikandar) अगदी सहज मागे टाकेल, असंही बोललं जात होतं. पण, यापैकी काहीच झालं नाही. एवढंच काय तर, सलमान खानच्या 'टायगर 3'ला (Tiger 3) सुद्धा 'सिकंदर' मागे टाकू शकला नाही. पण, हे सर्वजरी खरं असलं तरीसुद्धा हे पूर्ण सत्य नाही. 

सलमानच्या पहिल्या 5 सुरुवातीच्या चित्रपटांच्या यादीत 'सिकंदर'चा समावेश नाहीच

फिल्म क्रिटिक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटानं भारतात पहिल्या दिवशी 30.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तरण आदर्श यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असंही लिहिलं आहे की, हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीतील पहिल्या 5 सुरुवातीच्या चित्रपटांमध्येही स्थान मिळवू शकला नाही.

पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सलमानचा चित्रपट टायगर 3 होता, ज्यानं 43 कोटी रुपये कमावले. 'भारत' 42.30 कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आणि 'प्रेम रतन धन पायो' 40.35 कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या दिवशी 'सुल्तान'नं 36.54 कोटी रुपये कमावले आणि 'टायगर जिंदा है'नं 34.10 कोटी रुपये कमावले आणि पाचवं स्थान पटकावलं.

'सिकंदर' 2025 चा सर्वात मोठा ओपनर बनू शकला नाही 

'सिकंदर' हा वर्षातील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरेल, अशी अपेक्षा होती. पण, राम चरणचा गेमचेंजर अजूनही देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट आहे. ज्यानं पहिल्या दिवशी 54 कोटी रुपये कमावले. याशिवाय, हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट 'छावा'लाही मागे टाकण्यात अपयशी ठरला, ज्यानं पहिल्या दिवशी 33.10 कोटी रुपये कमावले.

'छावा'पेक्षा मागे राहूनही 'सिकंदर'नेमका जिंकला कुठे?

पहिल्या दिवसाच्या सुरुवातीत 'सिकंदर' 'छावा' पेक्षा मागे पडला. हे खरं आहे आणि त्याचे आकडेही बाहेर आले आहेत, पण हे आकडे फक्त देशांतर्गत बाजारपेठेचे आहेत. जर आपण जगभरातील पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली, तर आणखी एक सत्य समोर येतं. खरंतर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनशी संबंधित अधिकृत आकडेवारी शेअर केली आहे. त्यांच्या मते, 'सिकंदर'नं पहिल्या दिवशी 54.72 कोटी रुपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. तर 'छावा' चित्रपटानं पहिल्या दिवशी जगभरात 50 कोटी रुपयांची कमाई केली. सलमानच्या चाहत्यांसाठी ही बातमी निश्चितच आनंदाची आहे. ईदच्या निमित्तानं चित्रपटाच्या कलेक्शनवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट आणखी काही विक्रम करू शकेल अशी शक्यता आहे.

दरम्यान, आमिर खानचा 'गजनी' दिग्दर्शित करणारा साऊथ दिग्दर्शक ए आर मुरुगदॉस यांनीच 'सिकंदर' दिग्दर्शित केला आहे. 200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना, सत्यराज आणि प्रतीक बब्बरही आहे. या फिल्ममार्फत भाईजान जवळपास 2 वर्षांनी थिएटरमध्ये झळकला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

साऊथच्या 'या' फिल्मनं बॉक्स ऑफिस गाजवलं, 3 दिवसांत वर्ल्डवाईल्ड 150 कोटींचा गल्ला, पण तरीसुद्धा मागावी लागली माफी, हटवले 17 सीन्स