L2 Empuraan WorldWide Box Office Collection: मल्याळम सुपरस्टार (Malayalam Superstar) मोहनलाल (Mohanlaal) यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला आहे. 'एल2 एम्पूरन'नं (L2 Empuraan) फक्त तीनच दिवसांत बजेट वसूल केलं असून 150 कोटींचा गल्ला केला आहे. चित्रपटानं फक्त आणि फक्त दोनच दिवसांत 100 कोटींचा टप्पा गाठलाय. पण, बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुरळा उडवूनही 'एल2 एम्पूरन' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एवढंच काय तर, चित्रपटात लीड रोलमध्ये असलेल्या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी यासाठी माफीदेखील मागितली आहे. तसेच, यानंतर चित्रपटातील 17 सीन्स हटवण्यात आले आहेत.
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी माफी मागताना म्हटलंय की, "मी आणि 'एल2 एम्पूरन'ची संपूर्ण टीम माझ्या प्रियजनांना झालेल्या मानसिक त्रासासाठी इमानदारीनं दिलगिरी व्यक्त करतो. चित्रपटाबाबतीत सर्वांची जबाबदारी लक्षात घेऊन, आम्ही एकत्रितपणे चित्रपटातून अशी दृश्य सक्तीनं काढून टाकण्याचा निर्णय घेत आहोत." गुजरात दंगलींशी संबंधित काही संदर्भांवरून गोंधळ निर्माण झाल्यामुळे चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमनं चित्रपटातील काही सीन्स काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि चित्रपटाचे निर्माते पृथ्वीराज सुकुमारन यांनी मोहनलाल यांची फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्यानं पुढे म्हटलंय की, "गेल्या चार दशकांपासून मी माझं सिनेमॅटिक जीवन तुमच्यापैकी एक म्हणून जगतोय. तुमचं प्रेम आणि विश्वास हीच माझी एकमेव ताकद आहे. मला वाटतंय की, मोहनलाल यापेक्षा जास्त काहीच नाही..."
दरम्यान, L2 Empuran मध्ये 2002 च्या गुजरात दंगलींशी (Gujarat Riots) संबंधित काही सीन्स आहेत, जे आता एडिट करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमनं याची पुष्टी केली आहे आणि सांगितलं आहे की, 17 दृश्य काढून टाकण्यात आली आहेत. अशातच L2 Empuran बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहे. भारतात 3 दिवसांत 46.12 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील आकडा 150 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :