Sikandar Box Office Collection Day 9: बॉलिवूडचा दबंग भाईजानचा बहुचर्चित 'सिकंदर' (Sikandar) बॉक्स ऑफिसवर (Box Office) खास कमाई करू शकला नाही. जरी 'सिकंदर' सलमान खानचा (Salman Khan) 18वा 100 कोटींचा चित्रपट बनला असला तरीसुद्धा तो बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) छप्पडफाड कमाई करू शकलेला नाही. एरव्ही टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात पार पडणारा भाईजानच्या चित्रपटाचा शो पाहण्यासाठी फारसं कुणी फिरकतंच नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत आणि रविवार असल्यानं आठव्या दिवशी चित्रपटाच्या कमाई मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पण, विक डेजमध्ये 'सिकंदर'ची कमाई घटल्याचं पाहायला मिळालं. जाणून घेऊयात, चित्रपटानं आजवर किती कोटींचा गल्ला जमवला? त्याबाबत सविस्तर...
'सिकंदर' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
एआर मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर'नं दररोज किती कमाई केली? खालच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता. कृपया लक्षात घ्या की हे आकडे SACNILC नं दिलेल्या आकडेवारीनुसार आहेत, त्यामुळे हे अंतिम नाहीत. ही आकडेवारी सकाळी 10:45 पर्यंतची आहे आणि त्यात बदल होऊ शकतो.
| दिन | कमाई (कोटींमध्ये) |
| पहिला दिवस | 26 |
| दुसरा दिवस | 29 |
| तिसरा दिवस | 19.5 |
| चौथा दिवस | 9.75 |
| पांचवा दिवस | 6 |
| सहावा दिवस | 3.5 |
| सातवा दिवस | 4 |
| आठवा दिवस | 4.75 |
| नववा दिवस | 1.75 |
| टोटल | 104.25 कोटी रुपये |
'सिकंदर'ची गेल्या 9 दिवसांतील आजची सर्वात कमी कमाई
विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं 35 व्या दिवशी सॅक्निल्कनं जितकी कमाई केली, तितकीच कमाई केली हे खूप निराशाजनक आहे. 'छावा'नं 35 व्या दिवशी 2.25 कोटी रुपये कमावले होते आणि 'सिकंदर'साठी हा आकडा गाठणं कठीण वाटतंय.
'सिकंदर'मधील स्टारकास्ट आणि बजेट
'सिकंदर'मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहे आणि त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे, जिनं 'पुष्पा 2', 'छावा' आणि 'अॅनिमल' असे सलग तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर आणि शर्मन जोशी यांनीही 'सिकंदर'मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाहुबली'मध्ये कटप्पाची भूमिका साकारून हिंदी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवणारा अभिनेता सत्यराज या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. गजनी आणि हॉलिडे सारखे चित्रपट देणारे दक्षिणेतील दिग्दर्शक एआर मुरुगादोस यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी 200 कोटी रुपयांचं बजेट खर्च केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :