Chhaava Box Office Collection Day 53: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) एकामागून एक रेकॉर्ड मोडले. या चित्रपटानं अलिकडेच 'स्त्री 2' (Stree 2) ला मागे टाकत भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सातवं स्थान पटकावलं आहे. थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण करणाऱ्या या चित्रपटानं आठव्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा दमदार कमाई केली आहे. त्यामुळे 'छावा'च्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 53 दिवस झाले आहेत आणि आजच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत. जाणून घेऊयात 'छावा'नं आतापर्यंत किती रुपयांची कमाई केली? त्याबद्दल सविस्तर... 

'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

अधिकृत आकडेवारीनुसार, 'छावा'नं हिंदी आणि तेलुगूमध्ये 7 आठवड्यात 609.87 कोटी रुपये कमावले आहेत. यानंतर, सॅक्निल्कच्या मते, 50 व्या दिवशी चित्रपटाची कमाई 55 लाख होती. 51 व्या आणि 52 व्या दिवशी ही कमाई वाढून 95 लाख रुपये आणि 1.25 कोटी रुपये झाली. तर, चित्रपटाच्या 53व्या दिवशी सकाळी 10.45 वाजेपर्यंत म्हणजेच, 53व्या दिवशी चित्रपटानं 35 लाख रुपयांचा गल्ला जमवला. तर, चित्रपटाची एकूण कमाई 612.97 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात. 

'सिकंदर'समोर झुकला नाही 'छावा'

सलमान खानचा 'छावा' चित्रपट रिलीज झाल्यानंतर 'छावा'ला मोठं नुकसान सहन करावं लागेल, असं बोललं जात होतं. मात्र, तसं काहीच झालं नाही. 'छावा'नं आपली धुवांधार कमाई सुरूच ठेवली. विक्की कौशलच्या 'छावा' समोर भाईजानच्या 'सिकंदर'नं गुडघे टेकले. बरं रिलीजनंतरच्या 53व्या दिवशीही 'छावा' थांबला नाही. 53व्या दिवशी 35 लाख रुपये कमावले. 

'छावा'कडे फक्त तीन दिवसांचा वेळ 

जरी 'सिकंदर' चित्रपटगृहांमध्ये फ्लॉप ठरला असला तरी, तो अजूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. याशिवाय, सनी देओलचा 'जाट' तीन दिवसांनी म्हणजेच, 10 एप्रिल रोजी येत आहे. सनी देओलचा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे 'छावा'चे शो कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत, 'छावा'कडे कमाई करण्यासाठी फक्त तीनच दिवस उरले आहेत. कारण त्यानंतर, प्रेक्षक 'जाट' पाहण्यासाठी गर्दी करू लागतील.

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात विक्की कौशल व्यतिरिक्त रश्मिका, मंदाना, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंह यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  या चित्रपटात डायना पेंटी आणि आशुतोष राणा देखील आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ज्याच्यावर जीव जडला, त्याचाच जीव घ्यायला उठली...; मेंदुच्या चिंध्या करणारी थ्रीलर फिल्म; सस्पेन्सच्या बाबतीत तर 'कहानी', 'दृश्यम'पेक्षा सरस