Sikandar Box Office Collection Day 5: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar Movie) सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांनी भाईजाननं मोठ्या पडद्यावर कमबॅक केल्यामुळे 'सिकंदर' चर्चेत होता. तसेच, या चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकताही होती. पण, चाहत्यांची अपेक्षा मातीमोल ठरली. प्रदर्शित होण्यापूर्वी 'सिकंदर'बद्दल बरीच चर्चा झाली होती आणि असं वाटत होतं की, 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) मोठी कमाई करेल. पण तसं काहीच झालं नाही. 'सिकंदर' थिएटरमध्ये आल्यानंतर सर्वच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या. या चित्रपटाला फिल्म क्रिटिक्सकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळाला. तसेच, 'सिकंदर' रिलीज झाल्यानंतर काही तासांत पायरसीचा बळी ठरला. या सर्व कारणांमुळे सलमान खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. सिकंदरनं पाचव्या दिवशी किती कमावले?
'सिकंदर'ची पाचव्या दिवसाची कमाई किती?
'टायगर 3' प्रमाणेच, साजिद नाडियाडवालानं त्यांचा नवा अॅक्शन चित्रपट रविवारी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला कारण चित्रपटाला चांगली सुरुवात मिळाली नाहीतर चित्रपटाची सुरुवात फारशी चांगली झाली नसती. यानंतर, सोमवारी ईदची सुट्टी होती आणि चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. पण चौथ्या दिवशी, 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर घसरला आणि त्याची कमाई सिंगल डिजिटमध्ये आली.
आश्चर्याची बाब म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दिवस झाले आहेत. तरीसुद्धा, सलमान खानचं स्टारडम असूनही, चित्रपट अजूनही देशातील 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकलेला नाही. सॅक्निल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात...
- 'सिकंदर'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई 11.54% ने कमी झाली आणि त्यानं 29 कोटी रुपये कमावले.
- तिसऱ्या दिवशी 'सिकंदर'च्या कलेक्शनमध्ये 32.76 टक्क्यांनी घट झाली आणि त्याने 19.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- चौथ्या दिवशी चित्रपटाची कमाई 50 टक्क्यांनी कमी झाली आणि त्याचे कलेक्शन 9.75 कोटी रुपये झाले.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिकंदर'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी 5.75 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'सिकंदर'ची पाच दिवसांत एकूण कमाई आता 90 कोटी रुपये झाली आहे.
'सिकंदर' फ्लॉप होण्याचा धोका
'सिकंदर' 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आहे आणि तो भारतात अजूनही 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकलेला नाही. सलमान खानच्या चित्रपटासाठी हे आकडे मोठा धक्का देणार आहेत. कारण सुपरस्टारचे चित्रपट देशांतर्गत बाजारात कसे तरी कमाई करतात, पण 'सिकंदर'च्या बाबतीत असं होताना दिसत नाही. प्रदर्शित झाल्यानंतर पाच दिवसांतच चित्रपटाची अवस्था वाईट झाली आहे. ज्या वेगानं तो कमाई करत आहे ते पाहता, तो जास्तीत जास्त 150 कोटी रुपयांपर्यंत कमाई करेल. तर हिट होण्यासाठी त्याला दुप्पट बजेट म्हणजेच, 400 कोटी कमावणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत 'सिकंदर' हा आकडा गाठणं अशक्य वाटत आहे. सध्या, 'सिकंदर' फ्लॉप होण्याची शक्यता जास्त आहे.
दरम्यान, 'सिकंदर'मध्ये बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. तर, त्याच्यासोबत रश्मिका मंदानानंही स्क्रिन शेअर केली आहे. तसेच, या चित्रपटाचं दिग्दर्शन ए आर मुरुगादॉस यांनी केलं आहे. याव्यतिरिक्त प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल, शरमन जोशी हे कलाकारही या चित्रपटात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :