Sidharth Shukla Death News Live Updates : सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचं कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टम सुरु, तीन डॅाक्टरांची टीम करतेय पोस्टमॉर्टम

Sidharth Shukla Death News Live : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Sep 2021 06:47 PM
सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचं कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टम सुरु, तीन डॅाक्टरांची टीम करतेय पोस्टमॉर्टम

सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचं कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टम सुरु, तीन डॅाक्टरांची टीम करतेय पोस्टमॉर्टम , पोस्टमॉर्टमची व्हिडीओ रेकॅार्डिंग आणि फोटोग्राफी केली जाणार, व्हिसेरा केमिकल अॅनालिसीससाठी जपून ठेवला जाणार, फॅारेंन्सिक लॅबला पाठवण्यात येणार, हिस्टोपॅथलॅाजी स्टडी करण्यात येणार,  

सिद्धार्थच्या अकाली एक्झिटमुळं चाहते भावूक, कूपर रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवालानंतर सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनं चाहते भावूक झाले आहेत. कूपर रुग्णालयाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे. 

त्याला त्याच्या स्टारडमचा कधीच गर्व नव्हता; सुशांतचा मित्र मनोज मुंतशीर भावूक

सिद्धार्थ शुक्लासोबत अनेक वर्षे काम केलेला त्याचा मित्र मनोज मुंतशीर म्हणतो की, आम्ही दोघांनी अनेक वर्षे एकत्रित काम केलं. इतका मोठा होऊनही त्याला त्याच्या स्टारडमचा गर्व नव्हता, त्याचे पाय नेहमी जमिनीवर असायचे. आपण टीव्हीवरील एक मोठं नाव गमावलंय. 

सिद्धार्थ आपल्यातून निघून जाणं हे धक्कादायक : अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, "सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची वाईट बातमी समजली. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो पण अशा प्रकारचा हुशार व्यक्ती आपल्यातून निघून जाणं हे धक्कादायक आहे." 


 





सिद्धार्थ तू कायम स्मरणात राहशील : माधुरी दीक्षित

अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाली की, सिद्धार्थ तू कायम स्मरणात राहशील. माझ्या भावना सिद्धार्थच्या कुटुंबासोबत आहेत. 





अद्याप विश्वास बसत नाहीये; सिद्धार्थसोबत बालिका वधू मालिकेत झळकलेली अविका गौर भावूक

सिद्धार्थ शुक्लासोबत बालिका वधू या मालिकेत काम केलेल्या अभिनेत्री अविका गौर म्हणते, "सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने आपल्याला जबर धक्का बसला असून अद्याप त्यावर विश्वास बसत नाही. तो एक व्यक्ती म्हणून खूप चांगला होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो."

सिद्धार्थच्या अकाली जाण्यानं धक्का बसला, अभिनेता रितेश देशमुखचं ट्वीट

सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या अकाली निधनाने आपल्याला धक्का बसल्याचं अभिनेता रितेश देशमुखने म्हटलं आहे. सिद्धार्थवर लाखो चाहते प्रेम करायचे, त्याच्या आत्म्याला शांती लाभो असंही रितेश देशमुखने म्हटलं आहे. 





 


कूपर रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवला, सिद्धार्थच्या कुटुंबियांना पोलिसांकडून मदतीचं आश्वासन

पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुबियांना पूर्णपणे मदत करु, असं आश्वासन दिलं आहे. सिद्धार्थची बहिण आणि मेव्हणा रुग्णालयात उपस्थित आहेत. इतर कुटुंबियही रुग्णालयात पोहोचत आहेत. कुटुंबियांनी अंडरटेकिंगवर सही केल्यानंतर सिद्धार्थच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट होईल. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आली आहे. 

सिद्धार्थ शुक्लाची कारकिर्द कशी होती?

बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट, शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होणार

सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला असं बोललं जात असलं तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. शवविच्छेदनासाठी सिद्धार्थचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मेडिकल आणि शवविच्छेदनानंतरच सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. 

हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला, प्राथमिक माहिती

Sidharth Shukla Death : सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला, असं बोललं जात असलं तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

Sidharth Shukla Death : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

Sidharth Shukla Death : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. परंतु मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हृदय विकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खंर कारण कळू शकेल. मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

पार्श्वभूमी

Sidharth Shukla Death News Live : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. परंतु मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हृदय विकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खंर कारण कळू शकेल. मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. 


सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला असं बोललं जात असतं ती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 


सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


बिग बॉस 13 मुळे सिद्धार्थ पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला. त्यांची आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. दोघ काही दिवसांपूर्वी एकत्र बिग बॉस ओटीटीवर दिसून आले होते. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.