Siddharth Chandekar : मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. लवकरच सिद्धार्थ 'फसक्लास दाभाडे' या सिनेमातून भेटीस येतोय. नुकतच या सिनेमाचा पोस्टरही रिलीज करण्यात आलंय. दिवाळीचं औचित्य साधून सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंच पण याचनिमित्ताने विचारपूर्वक शुभेच्छाही सिद्धार्थने त्याच्या चाहत्यांना दिल्या आहेत. सिद्धार्थने नरक चतुर्दशीच्या दिवशी त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने त्याची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकरसोबतही फोटो शेअर केलेत.
सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावरुन दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटलं की, 'सगळं होणार! अगदी आपल्या मनासारखं. उद्या होईल किंवा परवा होईल. पण होणार मात्र नक्की. फक्त आपण जे करतोय त्यावर मनापासून विश्वास ठेवूया. नकोच तो अंधार आपल्या मनात. आजूबाजूच्या गोंगाटात आपल्याला सगळ्यात जास्त शांत करणारे चेहरे, जागा, क्षण डोळ्यासमोर ठेवूया. सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.'
फसक्लास दाभाडेचं पोस्टर रिलीज
निवेदिता सराफ, राजन भिसे, अमेय वाघ, राजसी भावे, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि हरिश दुधाणे ही कलाकार मंडळी फसक्लास दाभाडे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.. त्यामुळे या सिनेमाविषयी प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिलीये. या सिनेमाची कथा नेमकी काय असणार याचीही उत्सुकता आहे. हा सिनेमा येत्या 24 जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
सिद्धार्थ चांदेकरचे चित्रपट
सिद्धार्थ चांदेकरनं झिम्मा, गुलाबजाम, क्लासमेट्स, झेंडा आणि वजनदार या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच सिटी ऑफ ड्रिम्स या सीरिजमध्ये देखील सिद्धार्थनं महत्वाची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.