Siddhant Chaturvedi-Sara Tendulkar Break Up: क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Shubman Gill) ब्रेकअप झाल्यानंतर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार सिद्धांत चतुर्वेदीसोबत (Siddhant Chaturvedi) रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच, दोघे अनेकदा एकत्र स्पॉटही झाले होते. अशातच आता सिद्धांत आणि साराचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांनीही एकमेकांच्या पालकांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
सिद्धांतनं केलं ब्रेकअप
ईटाईम्सच्या वृत्तानुसार, सिद्धांत चतुर्वेदीनं स्वतः हे नातं संपवलं. सूत्राचा हवाला देत, त्यात म्हटलंय की, "सिद्धांत आणि साराचा अलिकडेच ब्रेकअप झाला. या तत्त्वांमुळेच नातं संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकमेकांच्या पालकांना भेटल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. दोघांनीही हे नातं अत्यंत गंभीरपणे सुरू केलं होतं. पण एकमेकांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर मात्र दोघांनीही रिलेशन संपवण्याचा निर्णय घेतला."
सिद्धांत आणि साराच्या ब्रेकअपचं खरं कारण काय?
सिद्धांत चतुर्वेदीच्या आधी साराचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं गेलेलं. दरम्यान, शुभमन गिलनं ती अफवा असल्याचं म्हटलं आणि तो कोणालाही डेट करत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. त्यासोबतच त्यानं तो सध्या अविवाहित असून क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत आहे, असंही सांगितलं.
अमिताभ बच्चन यांच्या नातीशी जोडलं गेलेलं सिद्धांत चतुर्वेदीचं नाव
सिद्धांत चतुर्वेदीबद्दल सांगायचं तर, त्याचं नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत जोडलं गेलेलं. नव्या आणि सिद्धांतच्या ब्रेकअपच्या चर्चा बराच काळ रंगल्या होत्या. नव्यासोबतच्या ब्रेकअपनंतर सिद्धांत आणि सारा रिलेशनशिपमध्ये आले होते.
सिद्धांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, त्यानं गली बॉयमधून इंडस्ट्रीत करिअरला सुरुवात केली. या चित्रपटामुळे त्याला खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली. यानंतर तो बंटी और बबली 2, गहराईयां, फोन भूत, खो गए हम कहाँ आणि युद्ध यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. आता तो धडक 2 आणि दिल का दरवाजा खोल ना डार्लिंगमध्ये दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :