Shyamchi Aai Got Best Marathi Film National Award: राजधानी दिल्लीत काल 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पाडला. या सोहळ्यात यंदा मराठीचा डंका पाहायला मिळाला. 'श्यामची आई' (Shyamchi Aai) हा सिनेमा 'सर्वोकृष्ट मराठी चित्रपट' (Best Marathi Film National Award) ठरला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते 'श्यामची आई'साठी अमृता अरुणराव यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला.

Continues below advertisement


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'श्यामची आई'साठी अमृता अरुणराव (Amruta Rao) यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला. महाराष्ट्राची नऊवारी नेसून पुरस्कार स्विकारत अमृता अरुणराव यांनी मराठमोळ्या संस्कृतीचा पेहराव सन्मानानं मिरवला. साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित 'श्यामची आई' ही कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. 'श्यामची आई'नं मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे पु्न्हा एकदा महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 


साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित 'श्यामची आई'


साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित 'श्यामची आई' ही कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे आणि ती एका आईचं प्रेम तिच्या मुलाच्या दृष्टिकोनातून उलगडते. अमृता फिल्म्स, पुणे फिल्म कंपनी, भालजी पेंढारकर आणि आल्मंड्स क्रिएशन्स प्रस्तुत श्यामची आई (मराठी) हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजींच्या बालपणावर आधारित आहे. हा चित्रपट 1953 साली प्रदर्शित झालेल्या त्याच नावाच्या जुन्या चित्रपटावर आधारित आहे.



साने गुरुजी (ओम भुतकर) तुरुंगात असून आपल्या बालपणाची कहाणी कैद्यांना सांगत आहेत. लहानपणी त्यांना श्याम म्हणून ओळखलं जायचं. श्याम (शर्वा गाडगीळ) यांचं बालपण खूप कठीण होतं, कारण त्यांच्या वडिलांना (संदीप पाठक), आईला (गौरी देशपांडे) आणि भावंडांना वडिलांच्या भावांनी घरातून हाकलून दिलं होतं. या सगळ्या संघर्षांमधूनही श्यामच्या आईने त्याला चांगले संस्कार दिले. ही कथा साने गुरुजी, म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने, यांच्या खऱ्या जीवनावर आधारित आहे. 


दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कारांत 'सर्वोत्तम अभिनेत्री'चा पुरस्कार राणी मुखर्जी हिला मिळाला, तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना 'सर्वोत्तम अभिनेत्याचा' पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, '12वी फेल' या चित्रपटाला 'सर्वोत्तम फिचर फिल्म'चा पुरस्कार मिळाला. सान्या मल्होत्राच्या 'कटहल' चित्रपटाला सर्वोत्तम हिंदी फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने साउंड डिझाईन आणि बॅकग्राउंड स्कोअर या दोन विभागांत पुरस्कार पटकावले. अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी'साठी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. विक्की कौशलच्या 'सॅम बहादूर'ला सर्वोत्तम मेकअप आणि कॉस्ट्युम डिझाईनचा पुरस्कार मिळाला. तसेच, साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा मानाच्या सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


71st National Film Awards: 71व्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण, शाहरुख, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव