Singham Again : श्वेता तिवारीने अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यांवर झळकत आली आहे. श्वेताने 1999 मध्ये आपल्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. दरम्यान आता तिची मोठ्या पडद्यांवर एंट्री होऊन बराच काळ लोटलाय. नुकताच रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सध्या या वेबसिरिजच्या तुफान चर्चा रंगल्या आहेत. या सिरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी यांच्याबरोबरच श्वेता तिवारीही झळकणार आहे. श्वेता एवढ्यावरच थांबलेली नाही. तिला आणखी एक सिनेमा मिळालाय.
'या' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
रोहित शेट्टी इंडियन पोलिस फोर्सच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. यामध्ये श्वेता तिवारीही दिसणार आहे. दरम्यान, श्वेता तिवारीने आणखी एक खुलासा केला आहे. तिने इंडियन पोलिस फोर्स या वेबसिरिजमध्ये काम करण्यापूर्वी रोहित शेट्टीने एक अट ठेवली होती. श्वेता तिवारी इंडिनय पोलीस फोर्सनंतर रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती दीपिका पादुकोणसोबत काम करताना दिसेल. यामध्ये ती गुप्तचर विभागात अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे.
सिंघम अगेनमध्ये दीपिका आणि अजय देवगणसोबत दिसणार श्वेता
'इंडियन पुलिस फोर्स'चा ट्रेलर लाँच होताना श्वेता तिवारीने मोठा खुलासा केलाय. रोहित शेट्टीने तिच्या पुढील भूमिकेसाठी एक अट ठेवली होती. रोहित शेट्टी म्हणाला होता की, तुम्हाला आणखी एक प्रोजेक्ट साइन करेल. फक्त इंडियन पोलीस फोर्सच्या सेटवर तिने रोज जेवण घेऊन यावे. मात्र, रोहित शेट्टीने हा विनोदचं केला होता. त्याने तिला सिंघम अगेनमध्ये महत्वाची भूमिका दिली. रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारी सिंघम अगेनमध्ये गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' भाग असणे माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब आहे. मला सिंघम अगेनसाठी कॉल आला तेव्हा मी पार उत्सुक होते.
'कसौटी जिंदगी की'मधून मिळाली ओळख
श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली. पण, तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'कलीरें' या टीव्ही मालिकेतून केली होती. या मालिकेतून तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. नंतर ती 'आने वाला पल' आणि 'कहीं किसी रोज' सारख्या मालिकांमध्ये झळकली. अभिनेत्रीने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारली होती. या पात्राचे लोकांना खूप कौतुक केले होते.
टीव्हीविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
श्वेताने वयाच्या 12 व्या वर्षी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यातून मिळणाऱ्या 500 रुपयांमधून तिने शाळेची फी जमा केली. श्वेता फार लहान वयातच पैसे कमवू लागली होती. पगारातून मिळणाऱ्या पैशातून ती तिच्या आवडीच्या वस्तू खरेदी करायची. कधीकाळी अवघे 500 रुपये कमावणारी श्वेता ही आजघडीला टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती सुमारे 60 ते 70 हजार रुपये मानधन घेते. अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली होती. वयाच्या 16व्या वर्षी तिला एका जाहिरातीसाठी कास्ट करण्यात आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
नागा चैतन्यच्या 'थंडेल'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष