Rajendra Kumar’s Wife and Kumar Gaurav’s Mother No More: हिंदी सिनेसृष्टीतून दुख:द बातमी समोर येत आहे. दिवंगत दिग्गज अभिनेते राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) यांच्या पत्नी आणि अभिनेता कुमार गौरव (Kumar gaurav) यांच्या आई शुक्ला कुमार यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार, अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt) बहीण म्हणजेच नम्रता दत्तशी कुमार गौरवने लग्न केले होतं. शुक्ला कुमार कायम प्रसिद्धी आणि लाइमलाइटपासून दूर राहत होते. त्यांनी कधीच कॅमेरासमोर येणं पसंत केलं नाही. त्यांच्या निधनानंतर केवळ कुटुंब नाही तर, संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.
शुक्ला कुमार यांच्या मृत्यूमागचं कारण काय?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कुटुंबाने घोषणा केली की, शुक्ला कुमार यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी 10 जानेवारी रोजी प्रार्थना सभा आयोजित करण्यात येत आहे. उद्योगातील प्रमुख व्यक्ती आणि सिनेसृष्टीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहतील. दरम्यान, शुक्ला कुमार यांचे निधन नेमके कशामुळे झाले? याचे कारण अद्याप समोर आले नाही.
शुक्ला कुमार राजेंद्र कुमार यांच्या पत्नी
शुक्ला कुमारचे पती, बॉलिवूडचे दिग्गज कलाकार राजेंद्र कुमार यांचे जवळपास 35 वर्षांपूर्वी निधन झाले होते. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राजेंद्र कुमारच्या कारकिर्दीत शुक्ला कुमार या मोलाचे वाटेकरू आहेत. राजेंद्र कुमार यांच्या प्रत्येक लढाईत त्या खंबीरपणे पाठीशी उभे होते. त्यांनी कधीच राजेंद्र कुमार यांची साथ सोडली नाही.
शुक्ला कुमारचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता
शुक्ला कुमार यांचं फॅमिली बॅकग्राऊंड फिल्मी इंडस्ट्रीतील आहे. रमेश बहल आणि श्याम बहल यांच्या शुक्ला कुमार बहीण होते. राजेंद्र कुमार आणि शुक्ला कुमार यांना तीन मुले आहेत. एका मुलगा आणि दोन मुली. त्यांचा मुलगा कुमार गौरव अभिनेता आहे. त्यानं अनेक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. तर, त्यांची मुलगी डिंपल हिनं हॉलिवूड चित्रपट निर्माते राजू पटेल यांच्यासोबत लग्न केले. तर, दुसऱ्या मुलीनं निर्माता ओ.पी. रेहलान यांच्याशी विवाह केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: