Mumbai News : शुभदा पाथरे यांच्या कला संस्कृती नृत्य अकादमीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार 29 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दुपारी 12 ते 3 अशी या सोहळ्याची वेळ आहे. मीरा रोड येथील लता मंगेशकर सभागृहात हा सोहळा पार पडेल. पहिल्या कनकशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सुमित्रा राजगुरु या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या असतील. सुमित्रा राजगुरु यावेळी संस्कृती नृत्य अकादमीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत.


या सोहळ्यात शुभदा पाथरे आणि त्यांचे विद्यार्थी स्वत: या सोहळ्यात शास्त्रीय नृत्य सादर करतील. त्याचप्रमाणे स्वर ओमानकुट्टन नायर, मृदंगम आर सक्त्यवर्धन आणि वायोलिन ई पी परामस्वरान हे साथ देणार आहेत. यानिमित्ताने प्रेक्षकांना शास्त्रीय नृत्याची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.


ही बातमी वाचा : 


Suraj Chavan : सूरजच्या झापुक झुपूक सिनेमाचा मुहूर्त, 'या' कलाकारांचीही लागली सिनेमात वर्णी