Shruti Narayan On Leak Casting Couch Video: दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती नारायणन हिचा कथित कास्टिंग काऊच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवरुन श्रुती चांगलीच भडकलेली पाहायला मिळालाये. ज्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय, त्या लोकांवर अभिनेत्री भडकली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन श्रुतीने या लोकांवरचा राग व्यक्त केलाय. 

श्रुती नारायणमने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट केल्या होत्या ज्या आता काढून टाकण्यात आल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले होते की, 'तुम्हा लोकांसाठी, माझ्याबद्दल असं काही  पसरवणं गे मजेदार वाटतं असेल. तुम्हा सर्वांना मजा येत असेल.  पण माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे. विशेषत: माझ्यासाठी हा खूप कठीण काळ आहे आणि तो हाताळणे कठीण आहे.

श्रुती पुढे लिहिताना म्हणाली, 'मी देखील एक मुलगी आहे आणि मलाही भावना आहेत.  माझ्या जवळच्या लोकांनाही भावना आहेत आणि तुम्ही लोक ते वाईट करत आहात. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, सर्व काही जंगलातील वणव्यासारखे पसरवू नका. तुमच्या आई, बहिण किंवा मैत्रिणीचे व्हिडिओ पाहा कारण त्या देखील मुली आहेत आणि त्यांचेही शरीर माझ्यासारखेच आहे, त्यामुळे जा आणि त्यांच्या व्हिडिओंचा आनंद घ्या.

संपूर्ण पोस्टमध्ये श्रुती नारायण तिला ट्रोल करणाऱ्या लोकांवर भडकलेली पाहायला मिळाली. तिने  लिहिले की, 'हे एका व्यक्तीचे जीवन आहे, तुमचे मनोरंजन नाही. मी पीडितेला दोष देणाऱ्या अनेक टिप्पण्या आणि पोस्ट पाहिल्या आहेत. पण मला पुरुषांना विचारायचे आहे की असे का? महिलांना नेहमीच वेगळा न्याय का दिला जातो, तर असे व्हिडिओ लीक करणाऱ्या आणि पाहणाऱ्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही? यावर लोक ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत ते घृणास्पद आहे.

लिंक मागणे  बंद करा, माणूस बनायला सुरुवात करा. सर्व महिलांचे शरीराचे अवयव सारखेच असतात, जसे की तुमची आई, आजी, बहीण किंवा पत्नी. ही काही मोठी गोष्ट नाही. हा केवळ व्हिडिओ नसून हा कोणाच्या तरी मानसिक आरोग्याचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. AI-जनरेटेड डीपफेक लोकांचे जीवन उध्वस्त करत आहेत आणि जर तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होत असाल, तर तुम्ही देखील या समस्येचा भाग आहात. शेअर करणे थांबवा, लिंक्स मागणे बंद करा. माणूस होण्यास सुरुवात करा.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'मला शैतानानं निर्वस्त्र केलं अन् मला समजलं पण नाही..', मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत