shriya pilgaonkar : सध्या सोशल मीडियावर (Social Media) जुन्या गाण्यांचे रील्स बनवण्याची ट्रेंड सुरू असून, अनेक सेलिब्रिटीही यामध्ये भाग घेत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांची कन्या श्रिया पिळगावकर हिने देखील नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. श्रियाने (Shriya Pilgaonkar) इन्स्टाग्रामवर एक नवं रील शेअर केलं आहे.
या व्हिडीओत श्रिया 'तुम मेरे कौन हो' या नर्गिसच्या जुना हिंदी चित्रपटातील गाण्यावर डान्स आणि अभिनय करताना दिसत आहे. तिच्या अभिनयशैलीत एक खास अंदाज पाहायला मिळतोय. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. व्हिडीओमध्ये श्रियाचा (Shriya Pilgaonkar) जुन्या पद्धतीचा लूक, एक्सप्रेशन्स आणि तिचा निवडलेला गाण्याशी साजेसा अंदाज लक्ष वेधून घेतो आहे. अनेकांनी तिच्या स्टाइलचं आणि अभिनय कौशल्याचं कौतुक केलं आहे.
श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) ही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माता असून, तिने हिंदी आणि मराठी चित्रपटांबरोबरच वेबसीरिजमध्येही आपला ठसा उमटवला आहे. मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये तिने साकारलेली स्विटीची भूमिका सर्वांना आवडली होती.
श्रियाने वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत बिट्टू या पात्राची भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सचिन पिळगावकर यांनी 2013 दिग्दर्शित केलेल्या 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांतर्गत 'सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाला .
अभिनेता शाहरुख खान याच्या फॅन या चित्रपटातून श्रियाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मिर्झापूर या सिरीजमधील'स्वीटी गुप्ता' या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या