Shriya Pilgaonkar On Marriage: दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायक असलेल्या सचिन पिळगांवकरांनी (Sachin Pilgaonkar) अगदी बालपणापासूनच इंडस्ट्रीत (Film Industry) काम करायला सुरुवात केली. आजवर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची लेक श्रिया पिळगावकरही (Actress Shriya Pilgaonkar) इंडस्ट्रीत आपलं नाव गाजवत आहे. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर ओटीटीची लोकप्रिय (OTT Actress) अभिनेत्री आहे.
श्रियानं आजवर अनेक सुपरहिट वेबसीरिजमध्ये (Web Series) काम केलं आहे. नुकतीच ती 'मंडाला मर्डर्स' सीरिजमध्ये दिसलेली. श्रिया 36 वर्षांची आहे आणि अजूनही अविवाहित आहे. तिला अनेकदा लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला जातो. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत श्रियाला लग्नाबाबत विचारण्यात आलं. यावर तिनं आपलं मत मांडलं आहे. सचिन पिळगावकरांच्या लेकीनं लग्नाबाबत स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
लग्नबाबत नेमकं काय म्हणाली श्रिया पिळगावकर?
श्रिया पिळगावकरनं नुकतीच 'युवा'युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना श्रिया म्हणाली की, "गेल्या वर्षभरापासून लोक मला लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारतायत. पण यावर उत्तर द्यायचा माझ्यावर कधीच दबाव नव्हता... माझ्या आईवडिलांनासुद्धा पूर्ण कल्पना आहे की, जेव्हा मला असा मुलगा भेटेल, ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास टाकू शकते, तेव्हा मी लग्न करेन... हा निर्णय घाईघाईत घ्यायचा नाही हे माझं ठरलं आहे..."
"माझे आईवडील नेहमी मला हेच म्हणतात की, तुला लग्न करायचंच नसेल तरी आम्ही पाठिंबा देऊ... पण जर तुला लग्न करायचं असेल तर असं समजू नको कोणीतरी मुलगा अचानक नाट्यमयरितीनं तुझ्यासमोर येऊन उभा राहील... हे फक्त सिनेमातच चांगलं वाटतं. जर असं काही आपोआप झालं नाही तर तुलाही थोडे प्रयत्न करावे लागतील.", असं श्रिया पिळगावकर म्हणाली.
श्रिया पिळगांवकरनं पुढे बोलताना सांगितलं की, आई-बाबांनी मला विचारलं की, तू तसे प्रयत्न करत आहेस का? यावर मला हसू आलं. अनेकदा लोक म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रयत्न करत नसता तेव्हा अचानक तुम्हाला कोणीतरी भेटतं. त्यामुळे मी नेहमी खाली पाहूनच चालते. म्हणजे मी त्याचा शोध घेतच नाहीये अशा आविर्भावात मी चालते...", असं श्रिया पिळगावकरनं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :