Shriya Pilgaonkar : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) , दिव्येंदू शर्मा Divyenndu,अली फजल (Ali Fazal) आणि श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar)यांची मुख्य भूमिका साकारलेल्या मिर्झापूर या वेबसिरीजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. पंकज त्रिपाठीने राजकारण, हिंसाचार ते स्मगलिंग अशी अनेक कंगोरे असणाऱ्या वेबसिरीजने चाहत्यांची मने जिंकली होती. दरम्यान मिर्झापूरच्या सिझन 1 मध्ये एक सीन आहे, जिथे दिव्येंदू शर्मा म्हणजेच मुन्ना भैय्या प्रचंड हिंसाचार करतो. या सीनची पडद्यामागील स्टोरी श्रिया पिळगावकरने शेअर केली आहे. 


श्रिया पिळगावकरने फोटो शेअर करत सांगितली स्टोरी 


अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने मिर्झापूर मधील त्या सीनमधील एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या पोस्टमध्ये श्रिया लिहिते, "विक्रांत मेस्सी, हा मिर्झापूर सिझन 1 मधील सीन आहे. क्लायमॅक्सपूर्वी आम्ही या सीनसाठी तयार होत असताना हा फोटो काढला होता. क्षमता आणि योग्यता असलेल्या अभिनेत्यांना अभिनय करताना पाहणे नेहमीच प्रेरणादायी असते. तुमच्या कलेवर लक्ष केंद्रित करा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि शांतपणे काम करत राहा" श्रिया पिळगावकरची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. मिर्झापूर या सिरिजमध्ये पंकज त्रिपाठीने 'कालीन भैय्या'ची भूमिका साकारली होती. तर दिव्येंदू शर्मा 'मुन्ना भैय्या'ची भूमिका वठवली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मचे (OTT) प्रस्थ वाढल्यानंतर मिर्जापूरच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या होत्या. दरम्यान, आता मिर्जापूर सिझन 3 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


मिर्जापूरचा सिझन 3 कधी रिलीज होणार?


मिर्जापूर सिझन 3 ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्जापूरचे 2 सिझन आत्तापर्यंत हिट राहिले आहेत. राजकारण, हिंसाचार आणि प्रेम प्रकरण हा वेबसिरिजचा केंद्र बिंदू राहिलाय. त्यामुळे सिझन 3 मध्ये काही वेगळेपणा असणार का? असे प्रश्नही प्रेक्षकांना पडले आहेत. 2024 मध्ये मिर्जापूरचा तिसरा सिझन रिलीज होण्याची शक्यता आहे. पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांची तिसऱ्या सिझनमध्ये मुख्य भूमिका असणार आहे. 


कालीन भैय्या मिर्झापूरची सत्ता राखणार?


मिर्झापूर सिझन 2 च्या शेवटी कालीन भैय्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तर मुन्ना भैय्यालाही ठार करण्यात आले होते. मात्र, कालीन भैय्याचा शेवट झाला नव्हता. त्यामुळे सिझन 3 मध्ये कालीन भैय्या पुनरागमन करत मिर्झापूरची सत्ता राखणार की गुड्डू भैय्या आपले वर्चस्व दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Telly Masala : मुनव्वर फारुकी 'बिग बॉस 17'चा विजेता ते 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'चे विजेते; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या