Shreya Bugde Mimicry Kangana Ranaut :  चला हवा येऊ द्या कार्यक्रम हा विनोदी कार्यक्रम वर्षभरानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना 10 वर्षे हसवणारा हा कार्यक्रम 2024 मध्ये बंद झाला होता. मात्र, आता दोन आठवड्यांपूर्वी हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे चला हवा येऊ द्याच्या कास्टमध्ये देखील मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहे. चला हवा येऊ द्या चा होस्ट निलेश साबळे सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे या क्रार्यक्रमात सध्या नाहीये. तर दुसरीकडे भाऊ कदम देखील सध्या या क्रार्यक्रमात पाहायला मिळत नाहीयेत.. दरम्यान, नव्या भागात विनोदी कलाकार श्रेया बुगडे हिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्रेया बुगडे (Shreya Bugde) हिने अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतची(Kangana Ranaut) मिमिक्री केलीये. याबाबतचा व्हिडीओ झी मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

Continues below advertisement

Continues below advertisement

श्रेया बुगडे हिने नव्या एपिसोडमध्ये कंगनाची अगदी खास पद्धतीने मिमिक्री केली आहे. व्हिडीओ पाहाताना अगदी कंगना राणौतचं बोलते की काय असं सर्वांना वाटतं. 

"चला हवा येऊ द्या"चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शनिवारी (26 जुलै) या नव्या पर्वाचा पहिला भाग प्रसारित झाला. पुन्हा एकदा लाडका कार्यक्रम परतल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, या हंगामात काही जुने कलाकार दिसत नाहीत, ज्यांची अनुपस्थिती प्रेक्षकांना जाणवत आहे. पहिला भाग संपल्यानंतर चाहत्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर “हा एपिसोड कसा वाटला?” असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर अनेकांनी निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडेला मिस केल्याचे सांगितले.

या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करत आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी या सीझनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या कलाकारांमध्ये गौरव मोरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव आणि भारत गणेशपुरे यांचा समावेश असून, त्यांच्या दरम्यान रंगणार्‍या कॉमेडी ‘गँगवार’मुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे.

 

इतर महत्त्त्वाच्या बातम्या 

बिपाशाच्या शरीराबद्दल मृणाल ठाकूरची संतापजनक कमेंट, आता बासूचंही जशास तसं प्रत्युत्तर VIDEO