Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) फेम 'ईठा' (Eetha) या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लावणी सम्राज्ञी आणि लोककलावंत स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांच्या जीवनावर आधारीत या बायोपिक सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.  हा सिनेमा आता 28 ऑगस्ट 2026 रोजी नसून, 4 डिसेंबरला रिलीज होणार असल्याची माहिती आहे.  Maddockfilmsने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाली असल्याची माहिती दिली. काही दिवसांपासून या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या (Entertainment) तारखेत बदल होणार असल्याची चर्चा होती. 'ईठा' हा सिनेमा बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकला. या सिनेमाच्या शीर्षकावरूनही वाद झाला. दरम्यान, आता या सिनेमाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

'ईठा' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल, सिनेमा कधी होणार रिलीज? (Shraddha Kapoors Eetha Release Date Changed)

श्रद्धा कपूरचा आगामी 'ईठा' हा सिनेमा लावणी सम्राज्ञी आणि लोककलावंत स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारीत एक बायोपिक आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर लीक झाला होता. या सिनेमातील श्रद्धा कपूरची अॅक्टिंग पाहून प्रेक्षकांनी तिचं भरभरुन कौतुक केलं.  या सिनेमातून विशेष लोककलेचा आणि लावणीचा इतिहास पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर हिच्या लूकची बरीच चर्चा झाली. टीझर पाहताच, हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते.  पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

Maddock Films  दिनेश विजन प्रस्तृत 'ईठा' हा सिनेमा आता 4 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.  प्रदर्शनाच्या बदललेल्या तारखेबाबत एक अधिकृत पोस्टही शेअर करण्यात आली आहे.  या पोस्टला एक कॅप्शनही देण्यात आलं आहे. 'तुफान के लिए तयार रहना, क्योंकि ईठा आ रही हैं.. 4 डिसेंबर को'. या  पोस्टला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा आधी 28 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज होणार होता. पण  आता प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.  या सिनेमात श्रद्धा कपूर इतर कलाकारांचीही फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमात मराठी कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'ईठा' या सिनेमात श्रद्धा कपूर व्यतिरिक्त  रणदीप हुड्डा, नाना पाटेकर आणि सिद्धार्थ जाधव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असल्याची माहिती आहे.  टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षक आतुर होते. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.  सध्या साऊथ सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' या सिनेमाची चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 26 ऑगस्ट 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, 28 ऑगस्ट 2026 रोजी 'ईठा' हा सिनेमा रिलीज होणार होता. नेमकं कोणत्या कारणास्तव या सिनेमाच्या तारखेत बदल करण्यात आला? आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण