Shraddha Kapoors Eetha Film Shubankar Ekbote: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या 'ईठा' (Eetha) या  सिनेमामुळे चर्चेत आहे.  या सिनेमातून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.  या सिनेमात हिंदीसह मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.  श्रद्धा कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत असून, या सिनेमात आणखी एका कलाकाराची महत्त्वाची भूमिका असणार आहे.  'ईठा' या सिनेमात श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. तर,  मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. यांसह या सिनेमात आणखी एक मराठी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.   

Continues below advertisement

सिद्धार्थ जाधवनंतर  'ईठा' या सिनेमात कोणत्या मराठी कलाकाराची एन्ट्री? (Shraddha Kapoors Eetha Film Shubankar Ekbote Entry)

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' या सिनेमात शुभंकर एकबोटे याची महत्त्वाची भूमिका असणार आहे.  या सिनेमात त्याची भूमिका नेमकी कोणती? या विषयावर त्याने  एबीपी माझाशी बोलताना भाष्य केलं आहे. शुभंकर म्हणाला, 'या सिनेमातील माझी भूमिका अगदी मजेशीर आहे.   मी 'छावा' या सिनेमात ज्या पद्धतीचं पात्र साकारलंय, तसे हे पात्र नाहीये. या पात्रात  ग्रे शेड आहे.  प्रेक्षकांना माझी भूमिका पाहून नक्कीच राग येऊ शकतो'.

'तसा मी प्रयत्न केला आहे काम करण्याचा.  माझी भूमिका छोटी आहे. पण पात्र साकारताना छान वाटलं.  त्या पात्रात काही गोष्टी मजेशीर करायला मिळाल्या, अर्थात याचं  क्रेडिट मी लक्ष्मण उतेकर यांना देऊ इच्छित आहे. तसेच संपूर्ण टीमला... जास्त या पात्राविषयी मी काही सांगू शकत नाही. प्रेक्षकांमधील जो सस्पेन्स आहे, तो 28 ऑगस्टला मोठ्या पडद्यावर दूर येईल. यातच खरी मज्जा आहे', यानंतर अभिनेत्याला ग्रे शेड म्हणजे काय? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शुभंकरने, 'ठरकी पद्धतीचं, बाईलवेडं पात्र', असं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, शुभंकरचे पात्र  नेमकं आहे तरी कोणतं? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.   सध्या प्रेक्षकवर्ग स्व. विठाबाई नारायणगावकर  यांच्या जीवनकथेवर आधारीत आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'ईठा' या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज होणार असून, या सिनेमाच्या तारखेत बदल होऊ शकतो, असं बोललं जात आहे. दरम्यान, नेमकं खरं काय? हे लवकर उघड होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?