Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. सिनेमांतील भूमिकांशिवाय श्रद्धा तिच्या फॅशिंग सेन्स आणि स्टाईलमुळेही चर्चेत असते. श्रद्धा सध्या तिच्या इन्स्टाग्रामवरिल पोस्टमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर पंजाबी ड्रेसवरिल फोटो शेअर चाहत्यांना तिने एक सवाल केला आहे. "मी छान दिसतेय, लग्न करु का?", असा सवाल श्रद्धाने चाहत्यांना केला आहे. त्यामुळे श्रद्धा देखील आता लग्नाळू संघटनेत दाखल झालीये, अशी प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत. 


श्रद्धाने लग्नाच्या प्रश्नावर चाहत्यांला दिले होते उत्तर 


काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) इन्स्टाग्रामवर (Social Media) एक फोटो पोस्ट केला होता. यावर एका चाहत्याने लग्न कधी करणार ? अशी कमेंट केली होती. चाहत्याच्या या प्रश्नाला श्रद्धाने कमेंट करुन प्रत्युत्तर दिले होते. "शेजारच्या काकू खऱ्या अकाऊंटवरुन प्रश्न विचारा" असे प्रत्युत्तर श्रद्धाने चाहत्याला दिले होते. दरम्यान, श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. लग्नासाठी पंडित पाहिजे का? असे एका यूजरने लिहिले आहे. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, फोटोंमुळे ट्रॅफिक जाम झाले आहे. 


श्रद्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो


अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केले आहेत. अनारकली ड्रेसमध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रद्धा अतिशय सुंदर दिसत आहे. श्रद्धाने वेगवेगळ्या पोज देत 4 फोटो शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. श्रद्धा कपूर तू झुठी मै मक्कार या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमात श्रद्धा समवेत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता श्रद्धा तिच्या स्त्री 2 या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रद्धा तिच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते. 










 


इतर महत्वाच्या बातम्या 


Jeh Ali Khan Kareena Kapoor : आधी फ्रंटसीटसाठी रडला, आता हातातला फुगा उडून गेला; करिनाच्या लेकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल