Jeh Ali Khan Kareena Kapoor : अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचे दोन्ही मुलं सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. करिनाचा मुलगा जेह आणि तैमूर व्हिडीओमधून सातत्याने स्पॉट होता. महिनाभरापूर्वी करिनाची फॅमिली नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्वित्झरलँडला गेली होती. त्यानंतर भारतात परतल्यानंतर करिनाचा (Kareena Kapoor) मुलगा जेह गाडीत बसण्यासाठी फ्रंटसीट मिळावी, यासाठी रडला होता. दरम्यान, जेह आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका बर्थडेसाठी गेल्यानंतर हातातील फुगा उडून गेल्यामुळे जेह हैराण झालाय. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


जेहची वाढदिवसाला हजेरी 


अभिनेत्री करिना कपूरचा दुसरा मुलगा सध्या तैमुरपेक्षाही जास्त चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वी फ्रंटसाठी रडल्यामुळे त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, जेह एका बर्थडेसाठी गेला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम उरकून जेह बाहेर पडला. करिनाच्या स्टाफने त्याला गाडीकडे नेण्यास सुरु केले. मात्र, मध्येच त्याच्या हातातील फुगा उडून गेला. त्यामुळे जेह चांगलाच हैराण झालेला पाहायला मिळाला. जेहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.


नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस


जेहच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एका यूजरने म्हटलय की, "सेम टू सेम करिनासारखा दिसत आहे". तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "बॉडीगार्ड काकांनी माझा फुगा उडवला, अशी तक्रा आईकडे कर". याशिवाय काही लोकांनी लिहिले आहे की, असाच प्रकार आम्ही लहान असताना आमच्यासोबतही घडत होता. जेहच्या या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. 


करीना आणि सैफ यांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले होते. सैफचा हा दुसरा विवाह होता. 2016 मध्ये  करीनाने तैमूरला जन्म दिला. फेब्रुवारी 2021 मध्ये करीनानं जेहला जन्म दिला. सैफने करिनाच्या आधी अमृता सिंगशी लग्न केले होते. अमृता आणि सैफ यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. त्यामुळे सैफच्या मुलांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. दरम्यान करिना आता सिंघम 3 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या नेटफ्लिक्सवरिल करिनाच्या जानेजा या सिनेमला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. 








 


इतर महत्वाच्या बातम्या 


VIDEO: एअरपोर्टवरुन आई-वडिलांसोबत हसत-खेळत आला, पण गाडीजवळ जाताच ढसाढसा रडायला लागला; सैफच्या लेकाच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा