Sholey Movie : "शोले सिनेमा रिलीज झाला, त्यावेळी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू झाली होती. आणीबाणीनंतरच्या सेन्सॉरचे नियम कडक झाले. त्यानंतर सेन्सॉरकडे सिनेमा गेला. 3 तास 24 मिनीटे इतक्या कालावधीचा होता. त्या सिनेमाचा शेवट होता की, ठाकूर गब्बर सिंगला मारतो. मात्र, सेन्सॉरने हरकत घेतली की, असा शेवट चालणार नाही. कारण आपल्याकडेचे नियम बदलेले आहेत. त्यामुळे आपण अगोदर जो शोले पाहिला. जुन्या हिंदी सिनेमांमध्ये शेवटी पोलीस यायचे आणि खलनायकाला अटक करुन घेऊन जायचे. शोलेचा शेवटचा शॉट त्यावेळी तसा होता. परंतु आता मूळ शेवट आता पाहायला मिळेल. आता 3 तास 24 मिनीटांचा सिनेमा पाहायला मिळेल. पूर्वी तो 3 तास 18 मिनींटाचा होता. आताचा जो शेवट आहे, तो सोशल मीडियाच्या युगात काही वर्षांपूर्वी लीक झाला होता. त्यामुळे लोकांनी आता पाहिला तर लोक म्हणतील हे आम्ही कुठेतरी पाहिलं होतं. हा सोशल मीडियाचा परिणाम आहे", असं ज्येष्ठ सिनेलेखक आणि विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

शोले पूर्वी देखील डाकूंवर सिनेमे आले होते. मात्र, शोले सिनेमात प्रेम आहे, मैत्री आहे. शोलेची गाणी आली तेव्हा संगीत शौकीनांनी म्हटलं हे काय संगीत तरी आहे का? त्यावेळी इतर सिनेमातील गाणी चालत होती. सुरुवातीला शोले सिनेमाची गाणी कोणाला आवडत नव्हती. सिनेमा जसा जसा हिट झाला तशी गाणी देखील जोरात चालली, असंही दिलीप ठाकूर यांनी सांगितलं. 

पुढे बोलताना दिलीप ठाकूर म्हणाले, डॅनी सुरुवातीला गब्बरची भूमिका करणार होता. विनोद खन्ना यांना देखील विचारण्यात आलं होतं. तीन नायक असल्यामुळे बऱ्याच जणांनी हा सिनेमा नाकारला. 

शोले सिनेमाबद्दल माहिती 

भारतीय चित्रपटसृष्टीत काही चित्रपट असे आहेत जे फक्त मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाहीत, तर पिढ्यांपिढ्या मनावर गारुड घालतात. 1975 साली प्रदर्शित झालेला शोले हा असा एक अजरामर चित्रपट आहे. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला आणि सलीम-जावेद यांनी लिहिलेला हा चित्रपट आजही लोकांच्या स्मरणात तितकाच ताजा आहे. शोलेची कथा रामगढ नावाच्या काल्पनिक गावात घडते. माजी पोलिस अधिकारी ठाकूर बलदेवसिंह (संजिव कुमार) आपल्या गावाला दहशतवादी गब्बर सिंगच्या (अमजद खान) अत्याचारातून मुक्त करण्यासाठी दोन लहान-मोठे गुन्हेगार – जय (अमिताभ बच्चन) आणि वीरू (धर्मेंद्र) – यांना पैसे देऊन लढण्यासाठी आणतो, अशी सिनेमाची स्टोरी आहे. 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shilpa Shirodkar Car Accident: अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा अपघात; बसची गाडीला जोरदार धडक, नेमकं काय घडलं?

राजमहालापेक्षा कमी नाही 'या' साऊथ सुपरस्टारचं घर; Inside फोटो पाहून डोळे दिपतील PHOTOs